मुंबईतील एक्झिट पोलने उडवली ठाकरेंची झोप (फोटो- सोशल मीडिया)
एक्झिट पोल्सनुसार मुंबईत शिवसेना-भाजपची सत्ता
ठाकरे बंधूंना मोठा दणका बसण्याची शक्यता
शिवसेना-भाजपला 138 जागा मिळण्याचा अंदाज
Municipal Exit Poll 2026/Thackeray Brothers Vs BJP: आज राज्यात 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडले. काही ठिकाणी गोंधळात तर काही ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पर पडली. अनेक ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडणे, बोटावरची शाई पुसली जाणे असे प्रकार घडले. दरम्यान मतदान झाल्यावर आज कोणत्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार याबाबत एक्झिट पोल्स समोर आले आहेत. यानुसार मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘जनमत’च्या एक्झिट पोलनुसार मुंबई महानगरपालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता येताना दिसून येत आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसनेच्या मिळून 138 जागा निवडणून येण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे व शरद पवार यांच्या यांच्या आघाडीला 62 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कॉँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीला 20 जागा मिळू शकतात. दरम्यान ही आकडेवारी एक्झिट पोलचे आकडे असून खरे आकडेवारी नाही. बहुमत कोणाच्या बाजूने येणार हे उद्याच्या निकालामधूनच स्पष्ट होणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत काडीनेच शाई लागणार
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बोटावर लावण्यात आलेल्या शाईवरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी ही शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप मतदारांनी आणि राजकीय नेत्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आता तातडीने मोठा निर्णय घेतला असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मार्कर पेनऐवजी पारंपारिक पद्धतीने इंडेलिबल इंक वापरण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “महानगरपालिका निवडणुकीतील मार्कर पेनचा अनुभव पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही इंडिलेबल इंकचा (काडीने लावण्यात येणारी शाई) वापर करणार आहोत. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी मतदारांच्या बोटाला पूर्वीप्रमाणेच काडीने शाई लावली जाईल.” शाई पुसली तरी बोगस मतदान शक्य नसल्याचे आयोगाने निक्षून सांगितले आहे. मतदान केल्यानंतर मतदाराची रीतसर नोंद ठेवली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसली म्हणून कोणीही दुसऱ्यांदा मतदान करू शकत नाही. प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.






