Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: “रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण…”; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी लघुकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असून, अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध लादण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2025 | 09:55 PM
Pune News: “रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण…”; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडींच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता जिल्ह्यात रस्ते सुरक्षा विषयक आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच जिल्ह्यातील अपघाताच्या ठिकाणांची (ब्लॅकस्पॉट) व्यापक स्वरुपात जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभाग, पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

डूडी म्हणाले, पुणे जिल्ह्यात पुणे महापालिका हद्दीत १५ , भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण २२ , महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ २, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ १ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत २ असे एकूण ४२ ब्लॅकस्पॉट आहेत. रस्ते सुरक्षतितेच्यादृष्टीने या ठिकाणी लघुकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक असून, अशा ठिकाणी जाण्यास प्रतिबंध किंवा ठराविक कालावधीसाठी निर्बंध लादण्याची गरज आहे. याचबरोबर येथे  दिशादर्शक फलक लावणे, राडारोडा साफ करणे, बॅरिकेटींग आदी उपाययोजना करणे जरूरी असून, या उपाययोजनांची पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी करुन येत्या १ महिन्यात अहवाल सादर करावा असे त्यांनी सांगितले.

Pune News: ‘धरणातून विसर्ग करण्याआधी…’; जिल्हाधिकाऱ्यांच्या पुणे महानगरपालिकेला सूचना

मागील एका वर्षात जिल्ह्यात झालेल्या अपघाताची ठिकाणनिहाय कारणे शोधावीत. याअनुषंगाने सर्व संबंधित विभागाला सुरक्षात्मक उपाययोजना सूचना कराव्यात, याचे पालन सर्व संबधित यंत्रणांनी करावे. परिणामी जिल्ह्यातील इतर ठिकाणी याचा उपयोग होईल. खडकवासला धरण चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याकरीता वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी असे सांगून डुडी यांनी, रस्ते सुरक्षा जनजागृतीकरीता निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी बहीर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हा रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत करण्यात आलेल्या कामाबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पुणे महानगरपालिकेला सूचना

यंदा मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात लवकर झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाला होता. यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या पाण्यामुळे येथील नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला होता. लोकांच्या घरात पाणी शिरले होते. अनेक वाहने पाण्यात वाहून गेली होती. मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होते. यंदाचा पावसाळा अधिक असल्याने आता प्रशासन अलर्ट मोडवरून आले आहे. तशा सचूना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत.

Web Title: Jitendra dudi order to officers considering number of deaths in road accidents road safety measures pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • Pune
  • pune news
  • Road Accident

संबंधित बातम्या

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन
1

Mumbai- Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आता १० लेनचा होणार! वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारचा मेगा प्लॅन

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर
2

Pune MSRTC: पुणे एसटी विभागाला ऑक्टोबर महिन्यात 23 लाखांचे उत्पन्न; ‘ही’ कारणे ठरली फायदेशीर

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?
3

Pune Petrol Pump Strike: पुणेकरांनो पेट्रोल घ्या भरुन! संध्याकाळी सातनंतर होणार पेट्रोल पंप बंद, नेमकं कारण काय?

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश
4

Pitya Bhai in BJP: राज ठाकरेंची टीका लागली जिव्हारी! संघावरुन कान टोचताच पिट्या भाईचा भाजप प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.