Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिस अन् महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 8 दिवसात…

पुणे पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेत एकत्रितरित्या येत्या आठ दिवसांत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 12, 2026 | 12:54 PM
पुणे पोलिस अन् महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 8 दिवसात...

पुणे पोलिस अन् महानगरपालिका प्रशासनाचा मोठा निर्णय; येत्या 8 दिवसात...

Follow Us
Follow Us:

पुणे : अनधिकृत होर्डिंग्जमुळे पुणे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारे सुरक्षेचे प्रश्न यामुळे पुणे पोलिस आणि महानगरपालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेत एकत्रितरित्या येत्या आठ दिवसांत शहरातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज हटविण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

पावसाळ्यापुर्वी संयुक्तपणे करावयाच्या कामाबाबत पोलिस आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पोलिस आयुक्त यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अमितेश कुमार म्हणाले, अनधिकृत होर्डिंग्जमुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत आहे. ही समस्या कायमची सोडवण्यासाठी उद्यापासून पोलिस आणि महापालिका प्रशासन संयुक्त मोहीम हाती घेत आहे. केवळ होर्डिंग्ज काढण्यावर न थांबता, प्रिंटिंग छापील जाहिराती लावणार्‍यांवरही कठोर कारवाई केली जाईल. पावसाळ्यात शहरात पाणी साचण्याच्या तक्रारी असतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शहरातील ४०० संवेदनशील पॉईंट्स निश्चित केले आहेत. त्यांचे ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटांत वर्गीकरण केले असून, पावसाळ्यापूर्वी याठिकाणी आवश्यक ती सर्व कामे मार्गी लावली जात आहेत.

बेवारस वाहने टोईंगद्वारे कारवाई

रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या बेवारस वाहनांवर टोईंगच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. यासाठी वॉर्ड स्तरावर स्वतंत्र ‘डंपिंग यार्ड’ तयार केले जातील. शैक्षणिक संस्थांच्या १०० मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणार्‍या दुकानांवर आणि फुटपाथवरील अनधिकृत हॉकर्सवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

होर्डिंग्ज, अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी प्रयत्न – नवलकिशोर राम

पुणे शहरात रस्त्यांची संख्या कमी असून, त्यात अनेक बॉटलनेक्स (अडथळे) आहेत. ‘भविष्यात नवीन रस्ते आणि उड्डाणपूल उभारले जातीलच, पण सध्या असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये पुणे शहराला शिस्त लावणे गरजेचे आहे. महापालिका व पोलिस यांच्या समन्वयातून ही होर्डिंग्ज, अतिक्रमणमुक्त पुणे’ मोहीम यशस्वी केली जाईल,’ असे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सांगितले. पुणे शहरात सध्या ३ हजार अधिकृत होर्डिंग्ज असून, त्यातून महापालिकेला ४२ कोटींचा महसूल मिळतो, असेही यावेळी ते म्हणाले.

पुन्हा नियमभंग केल्यास थेट गुन्हा!

अनधिकृत होर्डिंग्जवर एकदा कारवाई केल्यानंतर जर संबंधित व्यक्तीने पुन्हा होर्डिंग लावले, तर त्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा व्यक्तींवर थेट गुन्हा दाखल करणे आणि होर्डिंग तयार करणारी मशीन जप्त करणे अशी कठोर पावले उचलली जातील, असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळणार की नाही? अधिकृत नियुक्तीआधीच स्थायी समिती अंदाजपत्रक मांडण्याची शक्यता

एफसी रोडवर विशेष मोहीम

वर्दळीचा भाग असलेल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर वारंवार कारवाई करूनही अतिक्रमण थांबत नाही. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता एफसी रोडवर मोठ्या प्रमाणावर व्यापक मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले.

Web Title: Pune police and municipal corporation administration have taken a big decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.