Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळणार की नाही? अधिकृत नियुक्तीआधीच स्थायी समिती अंदाजपत्रक मांडण्याची शक्यता

पुणे महापालिकेचा २०२६-२७ या वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळणार की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यांची अधिकृत नियुक्ती हाेण्यापुर्वीच स्थायी समिती अंदाजपत्रक मांडण्याची शक्यता आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 12, 2026 | 12:07 PM
PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

PMC, Pune News, Pune Municipal Corporation, Health Department

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे महापालिकेचा २०२६-२७ या वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वीकृत नगरसेवकांना निधी मिळणार की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यांची अधिकृत नियुक्ती हाेण्यापुर्वीच स्थायी समिती अंदाजपत्रक मांडण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवकांच्या निधीबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, त्यामुळे नव्याने नियुक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. १८ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवर अंतिम शिक्कामोर्तब होणार असले तरी त्याआधीच अर्थसंकल्पाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचल्याने निधीच्या तरतुदीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

 

महापालिकेच्या स्थायी समितीकडून २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे २४ मार्च रोजी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यासाठी शहरातील विद्यमान नगरसेवकांकडून त्यांच्या प्रभागांतील विकासकामांची यादी मागविण्यात आली आहे. या यादीच्या आधारे विविध विकासकामांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली जाणार आहे.

मात्र स्वीकृत नगरसेवकांची अधिकृत नियुक्ती १८ मार्च रोजी होणार असल्याने त्यांचा या प्रक्रियेत समावेश होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अर्थसंकल्पाची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याने नव्याने नियुक्त होणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील विकासकामांसाठी निधी मिळेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुरेसा कालावधी मिळणार नाही

महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांना सुमारे अडीच वर्षांचा कार्यकाळ मिळतो. त्यापैकी पहिल्याच वर्षी अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाली नाही तर प्रत्यक्ष विकासकामे राबविण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा कालावधी उरणार नाही, अशी भीती या नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे निधीअभावी पहिल्या वर्षातील संधी वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्थायी समिती अध्यक्षांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली आहे. स्वीकृत नगरसेवकांनाही त्यांच्या प्रस्तावित विकासकामांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात आवश्यक ती तरतूद करण्याचा विचार केला जाईल, असे संकेत देण्यात आल्याचे समजते.

Web Title: The standing committee is likely to present the budget before the official appointment of the approved corporators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
1

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
3

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.