पुणे : चित्रकला क्षेत्रात मागील १५ वर्षापासून दैदिप्यमान कामगिरी बजावणाऱ्या राष्ट्रीय कला तज्ञ व रेनबो आर्ट इन्स्टिट्यूटचे केतन शिरीष शहा यांना आय. डी. वाय. एम. संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षा पद्मभूषण पुरस्कार २०२३ या पुरस्काराने सन्मानित केले. यापूर्वी त्यांनी केलेल्या कामाबद्दल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
आय. डी. वाय. एम. संस्थेतर्फे राष्ट्रीय शिक्षा पद्मभूषण पुरस्कार २०२३ नुकताच शहा यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. चित्रकला क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाची दखल संस्थेतर्फे घेण्यात आली आहे. विशेषता स्केचिंग पोर्ट्रेट ऑइल पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, थ्रीडी वर्क अशा विविध पेंटिंगमध्ये शहा यांचे काम मोठे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो विद्यार्थ्यांनी धडे गिरवले आहेत. सन्मानचिन्ह, सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. चित्रकला क्षेत्रात काम करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मात्र तशाही परिस्थितीत आई-वडील , कुटुंब , नातलग आणि विद्यार्थ्यांची साथ मिळाल्याने प्रेरणा मिळत गेली. त्या माध्यमातून अनेक सन्मान होत गेल्यामुळे कामाप्रती प्रचंड प्रेम वाढले आहे, अशी भावना रेनबो आर्ट इन्स्टिट्यूटचे केतन शहा यांनी व्यक्त केली आहे.