Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News : 12 वीच्या विद्यार्थ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांची करडी नजर; परीक्षा केंद्रावर कर्डिले ठाण मांडून

नांदेडमध्ये परीक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. . प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या ठेवण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 26, 2026 | 04:29 PM
District Collector Rahul Kardile inspected the 12th board examination center in Nanded.

District Collector Rahul Kardile inspected the 12th board examination center in Nanded.

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : जिल्ह्यात इयत्ता बारावीच्या जीवशास्त्र विषयाची परीक्षा जिल्ह्यातील १०९ केंद्रांवर आज – सुरळीतपणे पार पडली. एकूण २१ हजार ९३७ परीक्षाथ्यापैकी २१ हजार ५५० विद्यार्थी उपस्थित राहिले असून उपस्थितीचे प्रमाण ९८.२४ टक्के नोंदविण्यात आले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे तसेच ड्रोन आणि व्हिडिओ कॅमेराच्या ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व १०९ केंद्रांवर परीक्षा शांततापूर्ण व कॉपीमुक्त वातावरणात पार पडल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. कंधार तालुक्यात पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रास भेट देऊन परीक्षा व्यवस्थेची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केली. ते या केंद्रावर पेपर संपेपर्यंत उपस्थित होते.

दहेली तांडा येथील व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद

त्यांच्यासमवेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे देखील उपस्थित होते. नायगाव तालुक्यात नरसी येथील राणी लक्ष्मीबाई कमवि येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड यांनी भेट दिली असता एक परीक्षार्थी गैरप्रकार करताना आढळून आला. संबंधित विद्यार्थ्यांवर मंडळाच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली. नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी यांनी माहूर येथील जगदंबा उच्च माध्यमिक विद्यालय येथे भेट दिली असता एका विद्यार्थ्यांवर गैरप्रकार प्रकरणी कारवाई करण्यात आली. तसेच किनवट येथील दहेलीतांडा या परीक्षा केंद्राच्या बाहेर काही अज्ञात व्यक्ती आढळून आल्याने त्या ठिकाणी संबंधित व्यक्तींविरोधात सिंदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती दहेलीताडा परीक्षा केंद्राचे संचालक यांनी दिली. २५ फेब्रुवारी रोजी जीवशास्त्राच्या पेपरसाठी जिल्हास्तरावरील सुमारे ६२ अधिकारी हे ६२ केंद्रांवर पूर्णवेळ उपस्थित होते. शिक्षण विभागाचे ७ अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी अशा एकूण ४० व इतर अधिकाऱ्यांनी भरारी पथकांमार्फत १०९ केंद्रांवर देखरेख ठेवली.

हे देखील वाचा : मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

धर्माबादमध्ये पाळला जाणार कडकडीत बंद

धर्माबाद शहरातील रामनगर या स्मशानभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्याच्या नगरपरिषदेच्या निर्णयावरून शहरात तीव्र वाद निर्माण झाला असून प्रशासन आणि नागरिक आमने-सामने आले आहेत. पार्श्वभूमीवर नागरिकांनी गुरुवार, २६ फेब्रुवारी रोजी धर्माबाद बंदची हाक दिल्याने शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाने शहरातील बाढती लोकसंख्या आणि पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी रामनगर स्मशानभूमी परिसरातील जागेची निवड केल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशासनाच्या मते, शहराला पुरवठा होणारे पाणी गोदावरी नदीतून घेतले जाते आणि शुद्धीकरण प्रक्रियेनंतरच ते नागरिकांना वितरित केले जाते. त्यामुळे स्मशानभूमी परिसरात पाण्याची टाकी उभारण्यास तांत्रिक अडचण नसून हा निर्णय वैज्ञानिक आणि नियोजनबद्ध असल्याचे प्रशासनाचे महणणे आहे. मात्र या निर्णयाला नागरिकांकडून तीव विरोध होत आहे. स्मशानभूमी ही धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील जागा असल्याने त्या परिसरात पिण्याच्या पाण्याची टाकी उभारणे योग्य नसल्याचा नागरिकांचा आक्षेप आहे.

हे देखील वाचा : स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Web Title: District collector rahul kardile inspected the 12th board examination center in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • hsc exam
  • maharashtra news
  • nanded news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
2

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
3

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.