Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kothrud Constituency Election 2024: कोथरूडमध्ये राजकारण तापलं? चंद्रकांत पाटील-अमोल बालवडकरांमधील वाद चव्हाट्यावर

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी अगदी सरक्षित  आणि बालेकिल्लाच समजला जातो. पण अमोल बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे याठिकाणी मतांचे विभाजन होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 28, 2024 | 10:20 AM
Kothrud Constituency Election 2024: कोथरूडमध्ये राजकारण तापलं? चंद्रकांत पाटील-अमोल बालवडकरांमधील वाद चव्हाट्यावर
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.  कोथरूडमध्ये भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात अमोल बालवडकर यांनीच दंड थोपटले आहेत. याठिकाणी महायुतीतच बंडखोरीचे सूर उमटू लागले आहे. त्यामुळे अमोल बालवडकर यांनी माघार घेतली नाही, तर या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

कोथरूड विधानसभेसाठी अमोल बालवडकर इच्छुक होते. पण भाजपकडून मागील प्रमाणे चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे अमोल बालवडकर नाराज होते. त्यांनी बंडखोरीचा इशारा देताच प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण हे प्रयत्नही अयशस्वी ठरले.

हेही वाचा: भाजपचा मुख्यमंत्रिपदासाठी ‘हा’ नवा फॉर्म्युला; निवडणूक जिंकली तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री…

धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी अमोल बालवडकर यांचे मेव्हणे पैलवान अभिजित कटके यांच्या वाघोलीतील घरावर आयकर विभागाने छापेमारी केली. त्याचवेळी बालवडकर यांच्यावरही अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर आता अमोल बालवडकर हे  कोथरूडमधून बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी अगदी सरक्षित  आणि बालेकिल्लाच समजला जातो. पण अमोल बालवडकर यांच्या बंडखोरीमुळे याठिकाणी मतांचे विभाजन होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.  अमोल बालवडकरांनी दंड थोपटल्यास  चंद्रकांत पाटील यांच्यासाठी हे मोठे आव्हान ठरणार आहे.विशेष म्हणजे कोथरूडमध्ये चौरंगी लढतही पाहायला मिळू शकते. याचे कारण म्हणजे,  भाजपकडून चंद्रकांत पाटील, महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे आणि आता अमोल बालवडकर हे चारजण कोथरूडमधून आपले नशीब आजमावण्यासाठी  निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

हेही वाचा: मुले असूनही तुमची किती प्रॉपर्टी तुम्ही दुसऱ्याच्या नावावर करू शकता? ‘हा’ नियम जाणून घ्या

कसं आहे कोथरूडचं राजकारण?

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे  चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडून आले. पण चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूरचे. त्यामुळे कोल्हापूर सोडून त्यांनी पुण्यातील कोथरूडमधून निवडणूक लढवल्यामुळे याठिकाणी स्थानिक विरूद्ध आयात उमेदवार या मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरत राहिली. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेक स्थानिक नेत्यांनी त्याठिकाणी नाराजीही व्यक्त केली. पण चंद्रकांत पाटील यांची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टर्मलाही कोथरूडकर आयात चंद्रकांत पाटील यांना स्वीकारतील का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

2008 मध्ये शिवाजनगर विघानसभा मतदारसंघाचे विभाजन झाले आणि कोथरूड हा नवा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे याठिकाणी निवडून आले. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या मेधा कुलकर्णी या निवडून आल्या.त्यांनी शिवसेनेच्या मोकाटे यांचा पराभव केला. 2019 मध्ये चंद्रकांत पाटील यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. तर मेधा कुलकर्णी यांना मात्र तिकीट नाकारण्यात आले. पण त्यामुळे मेधा कुलकर्णीही नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर भाजपने त्यांना राज्य सभेत पाठवून त्यांचंही पुर्नवसन केलं.

हेही वाचा: दिवाळीवर पावसाचे सावट! ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता, IMD कडून यलो अलर्ट

Web Title: Kothrud constituency election controversy between chandrakant patil and amol balwadkar on the rise nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 10:20 AM

Topics:  

  • BJP

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
2

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
4

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.