Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…

Rohit Pawar: उजनी ही आमची जीवनदायिनी आहे. शेतकरी आणि मच्छीमारांना विश्वासात न घेता, त्यांच्या जमिनीवर नांगर फिरवून हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत येथे उभा राहू देणार नाही, असे पवार म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2026 | 09:25 PM
रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन

रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन

Follow Us
Follow Us:
  • उजनीच्या ए आय डेटा सेंटरविरोधात शेतकरी-मच्छीमारांचा एल्गार
  • रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शक्तिप्रदर्शन
  • भिमानगरमध्ये चार तास महामार्ग ठप्प
इंदापूर/Rohit Pawar: उजनी धरण परिसरात प्रस्तावित ए आय डेटा सेंटरसह विविध ऊर्जा प्रकल्पांविरोधात शेतकरी आणि मच्छीमारांचा असंतोष शनिवारी (दि. ३१) भिमानगर येथे उफाळून आला. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुकारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली. इंदापूर, माढा, करमाळा, कर्जत आणि दौंड तालुक्यांतील हजारो शेतकरी, मच्छीमार आणि सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी झाले. सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून स्थानिकांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी २.३० वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.

उजनी धरण परिसरात ए आय दुसरा माणूस डेटा सेंटर, अणुऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, बॅटरी स्टोरेज आणि सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांमुळे उजनीच्या पाण्याचा वापर, शेती, पर्यावरण आणि मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भिमानगरमध्ये झालेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

उजनीवरील खाजगी मासेमारी ठेका रद्द; मच्छीमारांना मोठा दिलासा, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाठपुराव्याला यश

सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपीठावर

या आंदोलनात माजी मंत्री महादेवराव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार अभिजित पाटील, आमदार नारायण पाटील, विधान परिषद आमदार प्रतापसिंह मोहिते-पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले. उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे संरक्षण करावे, मच्छीमारांच्या उपजीविकेचा विचार करावा आणि स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवू नयेत, अशी मागणी करण्यात आली.

‘कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही!’

आमदार रोहित पवार यांनी प्रकल्पांविरोधात आक्रमक भूमिका मांडली. “उजनी ही आमची जीवनदायिनी आहे. शेतकरी आणि मच्छीमारांना विश्वासात न घेता, त्यांच्या जमिनीवर नांगर फिरवून हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत येथे उभा राहू देणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.

चार तास वाहतूक ठप्प

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या रास्ता रोकोमुळे पुणे-सोलापूर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पुणे आणि सोलापूर जिल्हा पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून शेतकरी व मच्छीमारांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्पाबाबत पुढील कार्यवाही केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाच्या आश्वासनामुळे आंदोलनाला तात्पुरता विराम मिळाला असला, तरी उजनीचे पाणी, शेतीचे भवितव्य, स्थानिक रोजगार आणि पर्यावरणाचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे राज्य सरकार या प्रकल्पांबाबत काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहित पवार आंदोलनात काय म्हणाले?

    Ans: हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत येथे उभा राहू देणार नाही, अशी ठाम भूमिका पवार यांनी मांडली.

  • Que: उजनी धरण परिसरात कोणता प्रकल्प प्रस्तावित आहे?

    Ans: उजनी धरण परिसरात ए आय डेटा सेंटरसह विविध ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहेत.

Web Title: Mla rohit pawar protest against ujani dam ai deta project fisherment and farmers indapur tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • BJP
  • fishermen
  • indapur news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Farmer Crop Loan: शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ नको; आमदार श्वेता महालेंच्या सूचना, अमोल साठेंच्या नेतृत्वात भाजपचे निवेदन
1

Farmer Crop Loan: शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ नको; आमदार श्वेता महालेंच्या सूचना, अमोल साठेंच्या नेतृत्वात भाजपचे निवेदन

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?
2

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
3

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला
4

‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा’, भाजप आमदाराच्या वक्तव्याने मोठा वाद, AI डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकीय संघर्ष वाढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.