Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Farmer Crop Loan: शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ नको; आमदार श्वेता महालेंच्या सूचना, अमोल साठेंच्या नेतृत्वात भाजपचे निवेदन

Buldhana Farmer SBI Crop Loan Issue: सातबाऱ्यावरील पतसंस्थेच्या बोजामुळे पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याची तक्रार भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 31, 2026 | 09:17 PM
Buldhana Farmer SBI Crop Loan Issue

Buldhana Farmer SBI Crop Loan Issue

Follow Us
Follow Us:
  • पीककर्जाचा मार्ग मोकळा करा
  • श्वेता महाले यांच्या बँकेला स्पष्ट सूचना
  • अमोल साठे यांच्या नेतृत्वात भाजपचा इशारा
बुलढाणा: सातबारा उताऱ्यावर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अथवा नागरी पतसंस्थेचा बोजा असल्याचे कारण पुढे करून पात्र शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे अमडापूर मंडळ तालुकाध्यक्ष अमोल साठे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाऱ्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या उदयनगर शाखा व्यवस्थापकांना निवेदन दिले. यावेळी आ. श्वेता महाले यांनीही बँक व्यवस्थापकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधत पात्र शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या. (Farmer )

Tur Crop: तुरीवर घाटे अळीचा प्रादुर्भाव; फुलोरा अवस्थेतील पिकाची काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यानंतरही सातबाऱ्यावरील पतसंस्थेच्या बोजाचे कारण देत नवीन पीककर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी पतसंस्थेचा बोजा असतानाही पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासंदर्भात निर्देश दिल्याचा दावा पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या निर्देशांसह लागू शासन निर्णय आणि बँकिंग नियमांनुसार कर्जप्रकरणांची तपासणी करून पात्र शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जितेंद्र कलंत्री, संजय महाले, दिगंबर राऊत, पुरुषोत्तम अवचार, विठ्ठल कलंत्री, मुरलीधर हेलगे,  प्रमोद घोटपी, प्रमोद क्षीरसागर, श्रीकांत – राऊत, शिवाजी साठे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

भाजपचा आंदोलनाचा इशारा

बँकेने शासनाचे आदेश व लागू मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या हक्कासाठी भाजपच्यावतीने बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. शेती हंगामात बियाणे, खते व इतर निविष्ठांच्या खरेदीसाठी शेतकऱ्याना वेळेवर पैशांची गरज असते. पीककर्जासाठी होणाऱ्या विलंबामुळे शेती नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आ. महाले यांनी बैंक व्यवस्थापकांशी चर्चा केली. पात्र शेतकऱ्यांना अनावश्यक अडचणी निर्माण करू नयेत आणि कोणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

मानोरा येथे पीककर्जाची परतफेड करणाऱ्यांना प्रतीक्षा

मानोरा येथे देथील पीककर्ज थकीत झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा देण्यासाठी शासनाने आतापर्यंत ४ याद्या जाहीर केल्या. मात्र नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाच्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर निधी देण्याची घोषणा होऊन वर्ष उलटले तरी अद्याप एकाही पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झालेली नसल्याने या शेतकयांची दिवाळीही गोड कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Bhimashankar Wildlife : जंगलात झाडेच उरली नाहीत तर प्राणी कुठे जाणार? भीमाशंकरमधील अंधाधुंद जंगलतोडीमुळे वन्यजीव थेट शेतात

Web Title: Mla shweta mahale on buldhana sbi denies farmer crop loan pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:17 PM

Topics:  

  • agricultural loans
  • BJP
  • Crisis on farmers
  • Farmer Loan Waiver

संबंधित बातम्या

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…
1

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?
2

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला
3

Maharashtra Politics : महायुतीत नेमकं चाललंय काय? धंगेकर – बन यांच्यात सोशल मीडिया वॉर, एकनाथ शिंदेंनी दिला महत्त्वाचा सल्ला

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार
4

Buldhana: २४०० हेक्टरवर चारा लागवडीचे नियोजन, ८ प्रकल्पांवर चारा लागवड; पशुसंवर्धन विभागचा पुढाकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.