Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident News: वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे पुणेकर वैतागले; वर्षभरात “हेवी व्हेईकल”चे ७२ अपघात

नवले पुलाप्रमाणे नगर रस्ता तसेच सोलापूर रस्ता अपघात रस्ता बनला आहे. दररोज अपघाताच्या घटना या रस्त्यांवर घडत आहेत. मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे असल्याचा आव आणत उपाययोजना शोधते.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2024 | 03:06 PM
Pune Accident News: वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे पुणेकर वैतागले; वर्षभरात "हेवी व्हेईकल"चे ७२ अपघात

Pune Accident News: वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे पुणेकर वैतागले; वर्षभरात "हेवी व्हेईकल"चे ७२ अपघात

Follow Us
Close
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक: शहरातील वाहतूक कोंडीने आणि अपघाताने पुणेकरांचा जीव मुठीत धरला आहे. नगर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघाताने शहरातील अपघातांची भयावह परिस्थिती दर्शवली असताना पुण्यात वर्षात तब्बल ७२ ‘हेवी व्हेईकल’चे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, त्यातील १२ अपघात हे एकट्या नगर रस्त्यावर झाले आहेत. ज्यात १५ जणांचा जीव गेला आहे.

सायकलीचं शहर ते दुचाकी आणि आता प्रचंड वाहतूक कोंडीचे शहर अशी पुण्याची बदलती ओळख होत आहे. गेल्या काही वर्षात वाहतूक कोंडीची स्थिती बिकटच होत चालली आहे. पोलीस तसेच महापालिका प्रशासन सर्वोतपरी उपाययोजना करत असताना देखील वर्षाला वाढत जाणारी वाहन संख्या ही स्थिती जशाच तशी ठेवत आहे. त्यात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात सत्र सुरूच आहे.

सर्व सामान्यांना आपली जीव मुठीत धरूच वाहने चालवावी लागतात. अपघात वाढत आहेत आणि त्यात हाकनाक नागरिकांचा बळी जात आहे. कधी मस्तवाल वाहन चालक जीव घेतात तर कधी मद्याच्या नशेतील चालकांकडून चिरडले जाते. अधून-मधून अतिवेग संकटात घेऊन जात आहे. अपघाताची काही हॉटस्पॉट तयार झाले आहेत. ज्याठिकाणी सर्वाधिक अपघात होत आहेत. नवले पूल हा त्यातीलच एक स्पॉट होता. मात्र, तेथील रस्त्याचे कामकाज केल्यापासून अपघाताचे प्रमाण लक्षणीय कमी झाल्याचे देखील पाहयला मिळत आहे.

हेही वाचा: Ulhasnagar Hit And Run : पुन्हा हिट अँड रन, मद्यधुंद कार चालकाची चार वाहनांना, नऊ गंभीर जखमी

नवले पुलाप्रमाणे नगर रस्ता तसेच सोलापूर रस्ता अपघात रस्ता बनला आहे. दररोज अपघाताच्या घटना या रस्त्यांवर घडत आहेत. मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे असल्याचा आव आणत उपाययोजना शोधते. मात्र, पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. दुसरे जड वाहनांना (हेवी व्हेईकल) शहरातील काही भागात ठरावीक वेळ दिलेली आहे. त्यावेळेतच त्यांना या भागांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, सर्रास याचे उल्लघंन होत असल्याचे पाहायला  मिळते. या जड वाहनांमुळे वाहतूक कोंडी देखील मोठी होते. पोलीस कारवाईचा दिखावा करतात, मात्र ठोस कारवाई होत नाहीच. त्यामुळे या हेवी व्हेईकल वाहनांचा बिनदक्त सर्वत्र वावर असतो. शहरात ७२५ अधिक अपघात झाले आहेत. त्यात ७२ अपघात हे हेवी व्हेईकल (जड वाहने) यांचे झाले असून, त्यात ७६ जणांचा जीव गेला आहे.

शहरात एकूण अपघात- २७५
हेव्ही व्हेकलचे अपघात– ७२, मृत्यू ७६
नगर रस्त्यावरील हेवी व्हेकल अपघात- १२, मृत्यू १५

हेही वाचा: वाघोलीत डंपरने 9 जणांना चिरडल्याचे प्रकरण; पोलिसांकडून मालकावर अटकेची कारवाई

ही आहेत अपघाताची कारणे…

– पुण्यात लाईन कटींगचे प्रमाण सर्वाधिक
– वाहनांचा वेग अधिक, ओव्हरटेक करताना काळजी न घेणे
– वाहतूकीचे नियम पाळले जात नाहीत.
– लोणीकंद पोलिसांच्या हद्दीत रस्त्यांवर काही अंतर स्ट्रीट लाईट नाही.
– रस्त्यावर पडलेले खड्डे, उंच गतीरोधक
– पादचारी कोठूनही रस्ता ओलांडतात.

ही घ्या काळजी…

– दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करावे.
– वाहनांचा वेग मर्यादितच असावा
– ओव्हरेट करताना काळजी घ्यावी, लेन कटींग करू नये
– वाहतूकीचे नियमांचे पालन करावे
– पादचारी मार्गावरूनच रस्ता ओलांडावा

Web Title: Last one year 72 heavy vehicle accident at pune city nagar road and 15 peoples loss their life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2024 | 03:05 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Accident News

संबंधित बातम्या

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
1

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
2

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…
3

पिंपरीत जिम ट्रेनर तरुण आणि तरुणीने केली युवकाची हत्या; हत्येनंतर दोघेही आरोपी पोलीस स्टेशला झाले हजर, आणि…

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी
4

पुण्यात तीन मंत्री, मात्र स्वारगेटकडे दुर्लक्ष का? ७० वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत, प्रवाशांकडून होतेय ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.