पुन्हा हिट अँड रन! मद्यधुंद कार चालकाची चार वाहनांना, नऊ गंभीर जखमी (फोटो सौजन्य-X)
Ulhasnagar Hit And Run News In Marathi: उल्हासनगरमध्ये हिट अँड रनची घटना घडली असून, मद्यधुंद चालकाने कार चालवत तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे पाच वाजता घडली. कारच्या धडक दिलेल्या वाहनांची चक्काचूर झाला आहे.
अपघातांची मालिका काही थांबण्याचे नाव घेत नाही. दारूच्या नशेत वाहन चालवून तळीराम स्वतःसहीत इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. पुणे, मुंबईत अपघाताच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना भीषण अपघात घडल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे. अपघातात जीवित हानी झाली नसली तरी सर्व अपघातग्रस्त गंभीर जखमी आहेत.
दारूच्या नशेत भरधाव वेगात कार चालवणाऱ्या चालकाने रिक्षा आणि मोटारसायकला जोरदार धडक दिली.यात पाच जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.तर कारमधील दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे.हा सर्व प्रकार उल्हासनगरच्या व्हिनस चौकात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 5 वाजता श्रीराम चौकाकडून व्हीनस चौकाच्या दिशेने एमएच 04 एचएफ 7030 ही गाडी वेगाने येत होती. त्याचवेळी प्रसूती रुग्णालयासमोर भाजी आणण्यासाठी जात असलेल्या एमएच 05 सीजी 9918 क्रमांकाच्या रिक्षाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की रिक्षा पलटी झाली.
जखमींना रुग्णालयात दाखल न करता पळ काढत कार चालकाने भरधाव वेगाने पुढे जंगल हॉटेल जवळील महादेव मंदिरासमोर एक्टिवावर जाणारे दीपक पाटकर यांना उडवले. तर 80 पेक्षा जास्त वेगाने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विनस चौकात चौथर्याला जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या बोनेटचा चेंदामेंदा झाला आहे.
अपघातानंतर सतर्क नागरिकांनी कारचालक आणि त्याचा मित्र या दोघांना शिताफीने बाहेर काढून मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.दीपक पाटकर आणि रिक्षा चालक दशरथ मोरे यांना उपचारासाठी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच भाजी विक्रेता गुप्ता याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारचालक आणि त्याचा सहकारी हे दोघेही दारूच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यच्या वाघोली परिसरात भरधाव वेगात आलेल्या डंपरने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना धडक दिली. यामध्ये दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेच्या वेळी डंपरचालक हा दारूच्या नशेत असल्याची माहिती मिळत असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गजानन शंकर तोट्रे (वय 26) असे त्या चालकाचे नाव आहे. या अपघातामुळे पुण्याच एकच खळबळ माजली. त्यातच आता उल्हासनगरमध्येही हिट अँड रनच असेच प्रकरण घडल्यामुळे गदारोळ माजला आहे.