Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोर राहील. कोकण, विदर्भात तुलनेने कमी पाऊस राहील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 18, 2026 | 08:48 AM
ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तीन चक्रीवादळांची शक्यता

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान तीन चक्रीवादळांची शक्यता

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहिला मिळत आहे. पुणे शहर आणि परिसरात पावसाने उघडीप दिल्याचे दिसून आले. त्यात ऑक्टोबर महिना सुरु होण्यापूर्वीच आता उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. नैर्ऋत्य मान्सूनही 19 सप्टेंबरपासून माघारीचा टप्पा गाठत आहे. पश्चिम राजस्थानातून सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला तो महाराष्ट्रातून जाणार आहे. त्यामुळे राज्यात परतीचा मान्सून चांगला बरसू शकतो.

सध्या अल निनोमुळे मान्सून हंगाम बहुतांश भागात खूप कमी पावसाचा गेला. मात्र, ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात तीन चक्रीवादळांची शक्यता आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या संक्रमण काळात, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरील कमी दाब प्रणालीच्या विकासासाठी अनुकूल होऊ शकते. ऑक्टोबर-डिसेंबर दरम्यान उत्तर हिंद महासागरावर तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळांची शक्यता आहे. स्पेस ॲप्लिकेशन सेंट, इस्रो, मोसडॅकद्वारे संयुक्तरीत्या हा अंदाज नुकताच देण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात 22 सप्‍टेंबरपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोर राहील. कोकण, विदर्भात तुलनेने कमी पाऊस राहील. राजस्थानातून परतीच्या पावसाला अनुकूल स्थिती होत आहे, तेथे 19 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस

महाराष्ट्रात १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला, म्हणजेच सरासरीपेक्षा १६.५ टक्के कमी पाऊस झाला. दीर्घकाळच्या दुष्काळामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये सरासरीच्या तुलनेत ६८.५ टक्के पाऊस झाला .

पाणीटंचाईची धास्ती

राज्यभरात पावसाने मोठा खंड दिल्याने संभाव्य पाणीटंचाईची धास्ती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी भूजल उपशावर निर्बंध घालण्याचे निर्देश शासनाने दिले असून, त्याची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातही होणार का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑक्टोबरपासून संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करून टंचाई कृती आराखडा निश्चित करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

Web Title: Light to moderate rainfall forecast in the state until september 22

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क
1

Weather Update : राज्यभरात पावसाचा मोठा खंड; पाणीटंचाईची निर्माण झाली धास्ती, प्रशासन सतर्क

Weather News: महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम; १७ सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे हवामान?
2

Weather News: महाराष्ट्रात पावसाची उघडीप कायम; १७ सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे कोरडे हवामान?

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका
3

राज्यात सरासरीपेक्षा 16.5 टक्के कमी पाऊस; खरीप पिकांना निर्माण झाला धोका

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार
4

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.