Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GBS रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या सहा गावांसाठी सरकारकडून ‘हा’ महत्वाचा निर्णय; अजित पवारांची माहिती

उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यातील जीबीएस आजाराविषयी चर्चा झाली. हा आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला हाेता.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 07, 2025 | 10:30 PM
GBS रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या सहा गावांसाठी सरकारकडून 'हा' महत्वाचा निर्णय; अजित पवारांची माहिती

GBS रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या सहा गावांसाठी सरकारकडून 'हा' महत्वाचा निर्णय; अजित पवारांची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  गुलयेन बॅरी सिन्ड्रोम (जीबीएस) रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेल्या सहा गावांमध्ये शुद्ध केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाचशे कोटी खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. या प्रकल्पासाठी पाचशे काेटी रुपये खर्च अपेक्षित असुन, महापालिका आणि राज्य सरकार त्याचा प्रत्येकी पन्नास टक्के वाटा उचलणार आहे.

विधान भवन येथे झालेल्या जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यातील जीबीएस आजाराविषयी चर्चा झाली. हा आजार दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचा अहवाल राष्ट्रीय विषाणू संस्थेने दिला हाेता. या पार्श्वभुमीवर सदर निर्णय घेण्यात आला.

सिंहगड रस्ता आणि परिसरातील पाचशे ते सहा गावांमध्ये प्रादुर्भाव झालेल्या ‘जीबीएस’ या रोगावर चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. पवार म्हणाले,‘‘ केंद्र सरकारच्या अमृत योजनेत या गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. परंतु तो मान्य झाला नाही. त्यामुळे राज्य सरकारने हा प्रकल्प उभारण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी जशी पुणे महापालिकेची आहे. तशीच ती राज्य सरकारची देखील आहे. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या सहा गावात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी २५० कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. तर उर्वरित २५० कोटी रुपये पुणे महापालिकेने उचलावा, असा निर्णय आज घेण्यात आला आहे.’’

हेही वाचा: Pune GBS News: ‘जीबीएस’बाबत पुणे महानगरपालिका सतर्क; जलप्रदूषित भागात शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा निर्णय

एक हजार पीपीपी बस घेणार

पीएमपीच्या ताफ्यातील बस जुन्या झाल्या आहेत. बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे एक हजार नवीन बसेस घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून २५० कोटी रुपयांचे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर उर्वरित अडीचशे कोटी रुपयांचा निधी हा पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका उचलणार आहे. पुणे महापालिका १५० कोटी रुपये, तर पिंपरी-चिंचवड महापालिका १०० कोटी रुपये खर्च उचलणार आहे. या सर्व ई बसेस घेण्याचा विचार होता. परंतु प्रत्यक्षात या बसेस येण्यास वेळ जाऊ लागतो. त्यामुळे टाटा कंपनीच्या जीएनजीवरील बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.असेही पवार यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

पाच जिल्ह्यांच्या आराखड्यास मंजुरी

पुणे विभागातील पुणे, साेलापुर, सातारा, सांगली, काेल्हापुर या पाच जिल्ह्यातील वार्षिक नियाेजनाच्या अाराखड्यास मंजुरी दिली. या बैठकीस उपस्थित असलेल्या या जिल्ह्यातील आमदार आदी लाेकप्रतिनिधींनी आपल्या जिल्ह्यास वाढीव तरतुद मिळावी, अशी मागणी केली. जिल्हाचे क्षेत्रफळ, लाेकसंख्या, एकत्रित उत्पन्न आदींचा वचार करून आराखड्यात तरतुद केली जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वच जिल्ह्यांना अधिक तरतुद केली जाईल असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra government and pmc built water purification project gbs virus affected villages said ajit apwar pune marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 10:29 PM

Topics:  

  • ajit pawar
  • GBS virus
  • Pune

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी
3

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क डीसीपीच्या गाडीलाच ठोकलं; डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद
4

पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी; सर्वप्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.