जीबीएस आजार होण्याचे कारण आले समोर (फोटो- istockphoto)
पुणे: शहरात गुईलेन बॅरे सिंड्राेम ( जीबीएस ) हा आजार दुषित पाण्यामुळेच हाेत असल्याची माहीती राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही ) दिलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. यामुळे बाधितग्रस्त भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभे करण्याचा निर्णय महापािलका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या महीन्याभरापासून शहरात विशेषत: सिंहगड रस्ता भागातील नांदेड, किरकटवाडी , नांदाेशी आदी परीसरात जीबीएस या आजारांचे रुग्ण माेठ्या प्रमाणावर आढळून आले. यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले हाेते. हा आजार संसर्गजन्य नसल्याचे वारंवार सांगण्यात येत हाेते.
हा आजार दुषित पाण्यामुळे, अन्नामुळे हाेत असल्याचा प्राथमिक अंदाज हाेता. महापािलकेकडून या भागातील पाण्याचे स्त्राेत, खासगी टॅंकर व्यावसाियक, आर ओ प्लांट व्यावसाियक आदी ठिकाणी पाण्याचे नमूने घेतले गेले. तसेच या भागातील मांस विक्रेत्यांकडून नमूने घेतले गेले. आजाराची बाधा झालेल्या रुग्णांचे शाैच, लघवी, रक्ताचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले हाेते. सदर नमूने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले हाेते.
या तपासणीनंतर एनआयव्हीकडून अहवाल आणि महापािलकेला काही सुचना देण्यात आल्या . याविषयी अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘‘ एनआयव्हीकडून आलेल्या अहवालानुसार जीबीएस आजार हा दुषित पाण्यामुळे हाेत असल्याचे स्पष्ट हाेत असुन, काही प्रमाणात प्राण्याच्या विष्ठेमुळे देखील ताे हाेऊ शकताे. या पार्श्वभुमीवर महापािलकेने या भागात तात्पुरत्या स्वरुपात एक एमएलडी इतक्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. एका महीन्यात हे केंद्र उभे केले जाईल. तसेच एनआयव्हीकडून पाण्यांचे नमूने घेताना ते दाेन लिटर इतके घ्यावेत, तसेच ते दाेन महीने साठवून ठेवून त्याची पुन्हा तपासणी करावी अशा सुचना केल्या आहेत. खासगी रुग्णालयांकडून नमूने पाठविण्यासंदर्भात सहकार्य केले जात नसल्याची चिंता अहवालात व्यक्त केली आहे. ’’
Pune GBS Update: नक्की पाणी प्यायचे कोणते? आधी टँकरच्या पाण्यात दूषितता अन् आता थेट…; जाणून घ्या
* पुणे शहरात आजपर्यंत जपर्यंत १२० संशयित रुग्ण आढळून आले. हिंगणे खुर्द येथे आणखी एका रुग्णाची नव्याने नाेंद झाली आहे.
* शहरातील ४१ रुग्ण हे पुर्णपणे बरे झाले असुन, त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात आले आहे.
* रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करण्यासाठी सर्व रुग्णालयात एक समुपदेशक नियुक्त करण्यास सुुरुवात केली गेली.
* आजारातून बरे झालेल्या रुग्णांना फिजीओथेरपी देण्यासाठी कमला नेहरू रुग्णालय, स्व.राजीव गांधी रुग्णालय, साेनावणे रुग्णालय येथे फिजीओथेरपी सेंटर सुरु केले आहे.
३० नमुन्यांचे मूल्यांकन
पीएमसी प्रशासनाला गेल्या आठवड्यात जीबीएस-प्रभावित भागात दररोज 800 फेऱ्या करणाऱ्या 15 खाजगी पाण्याच्या टँकर सेवा प्रदात्यांकडून घेतलेल्या नमुन्यांमध्ये बॅक्टेरियाचे दूषित घटक आढळले. 28 जानेवारी रोजी, पीएमसीने धायरी, सिंहगड रोड, किरकटवाडी, खडकवासला आणि आसपासच्या नांदेड शहराच्या परिसरात आरओ प्लांट, वॉटर एटीएम, पिण्याच्या पाण्याचे जार आणि पाणी विकणाऱ्या विक्रेत्यांकडून गोळा केलेल्या 30 नमुन्यांचे मूल्यांकन केले. यामध्ये बॅक्टेरियाचे दूषित प्रमाण स्वीकार्य पातळीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आढळून आले.