Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mula- Mutha River: ‘जायका’ प्रकल्पासाठी राज्य सरकारचा पुणे महापालिकेला १०० कोटींचा निधी

महापालिकेने शहरातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी जायका कंपनीने केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेला ८५० कोटीचे अनुदान दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2025 | 03:58 PM
Mula- Mutha River: 'जायका' प्रकल्पासाठी राज्य सरकारचा पुणे महापालिकेला १०० कोटींचा निधी

Mula- Mutha River: 'जायका' प्रकल्पासाठी राज्य सरकारचा पुणे महापालिकेला १०० कोटींचा निधी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शहरातील सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी सुरु असलेल्या ‘जायका’ प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महापािलकेला शंभर काेटी रुपयांचा निधी मिळाला आहे. हा प्रकल्प पुर्ण हाेण्याची मुदत संपत असुन, ती एक वर्षाने वाढवावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
सांडपाणी आणि मैलापाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी महापािलकेने  जपान इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह एजन्सी (जायका) च्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे आत्तापर्यंत ७० ते ८० टक्केच काम झाले आहे.

शहरात दररोज 1750 एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील 1400 एमएलडी मैलामिश्रित पाणी निर्माण होते. या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी 9 मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधले आहेत. या एसटीपी प्रकल्पामध्ये दररोज 367 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. हे पाणी प्रक्रिया करून नदीत सोडले जाते. तर उर्वरित मैलामिश्रित पाणी थेट नदीत मिसळते.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. या प्रकल्पासाठी जायका कंपनीने केंद्र शासनाच्या माध्यमातून महापालिकेला ८५० कोटीचे अनुदान दिले आहे. सदर अनुदान हे टप्प्या टप्प्याने महापािलकेला मिळत असुन, यातील शंभर काेटी रुपयांचा निधी हा राज्य सरकारमार्फत पुणे महापािलकेकडे जमा झाला आहे.

ओढे, नाल्यांवरील पाण्यावर प्रक्रिया
या प्रकल्पांतर्गत आंबील ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला, कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या शहरातील प्रमुख सहा ओढे व नाल्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना), नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड आणि कृषी महाविद्यालयातील बोट्यानिकल गार्डन या ११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प, ५५ किलो मीटर मैलापाणी वाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या प्रकल्पांतर्गत 10 एसटीपी प्रकल्पांची कामे सुरू असून बोट्यानिकल गार्डन येथील काम अद्याप सुरू झालेले नाही.

“नदीचे पात्र कमी होऊन मानव निर्मित…”; नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा

एसटीपी प्रकल्पाची कामे ८० टक्केच पूर्ण

प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२५ पर्यंत आहे. ही मुदत संपण्यास जेमतेम तेरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या एसटीपी प्रकल्पांची कामे आत्तापर्यंत ७० ते ८० टक्केच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या कामाला आणखी आणकी एक वर्षाची म्हणजे मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात खासदार मेधा कुलकर्णींचा इशारा

राम नदी आणि मुळा – मुठा नदीकाठ सुधार याेजनेसंदर्भात विभागीय आयुक्त  डाॅ. महेश पुलकुंडवार यांच्याबराेबर लवकरच संयुक्त बैठक हाेणार आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे. पुण्यातील नदी सुधार योजनेच्या ४४ किलोमीटर कामातील  राम नदी – मुळा नदी संगम येथील जागेची संयुक्त पाहणी खासदार कुलकर्णी यांनी केली. यावेळी महापािलका आयुक्त राजेंद्र भोसले , जीवित नदी संस्थेचे पुणे रिव्हर रिव्हर्सल संस्थेचे शैलजा देशपांडे व अन्य पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra government approve 100 crore fund to jica mula mutha river prject to pune corporation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 03:58 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी
1

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
3

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?
4

Gautami Patil : रिक्षाचालक अपघात प्रकरणी गौतमी पाटीलला होणार अटक? रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले, CCTV फुटेजमध्ये काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.