सौजन्य - नवराष्ट्र टीम
सातारा रस्ता हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून परिसरात शाळा, क्लासेस, आयटी कंपन्या तसेच विविध शासकीय कार्यालये आहेत. पुढे हा मार्ग सातारा तसेच मुंबई महामार्गाला जोडला जात असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यातच सध्या पावसाळा सुरू असल्याने खोदलेल्या भागातील माती व चिखल रस्त्यावर पसरत असून, खड्ड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे मनसेने निवेदनात म्हटले आहे.
संबंधित ठिकाणचा खड्डा तातडीने बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी तसेच खोदाईनंतर पडून असलेला राडारोडा तात्काळ हटवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी भविष्यात अपघात अथवा कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, असा इशारा मनसेने दिला आहे.यावेळी मनसेचे ऍंथोनी आढाव, महेश भोईबार, संतोष चव्हाण, आशिष साबळे, रोहन नडीमेटला, किशोर इंगवले यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.






