Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला ‘हा’ निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल

विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर गस्त वाढविण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 08:43 PM
Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला 'हा' निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल

Pune Airport प्रशासनाला बिबट्याचा धसका! तातडीने घेतला 'हा' निर्णय; प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल

Follow Us
Close
Follow Us:
विमानतळ प्रशासनाला बिबट्याचा धसका
शिडीचा वापर तातडीने बंद, सुरक्षा पथक तैनात
विमानतळ परिसरात अतिरिक्त सुरक्षा घेराबंदी

पुणे: लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या दिसल्याची घटना समोर आल्यानंतर विमानतळ प्रशासनाची मोठी धांदल उडाली आहे. या अनपेक्षित घटनेनंतर सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, विमानांच्या तपासणीसाठी वापरल्या जाणाऱ्या शिडीचा वापर तातडीने बंद करण्यात आला आहे. विमानतळ परिसरात अतिरिक्त सुरक्षा घेराबंदी करण्यात आली असून, एटीसीपासून ग्राउंड स्टाफपर्यंत सर्व यंत्रणा सतर्क मोडवर ठेवण्यात आल्या आहेत.

घटनेनुसार, विमानतळाच्या धावपट्टीच्या दुसऱ्या टोकाला सोमवारी व मंगळवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच विमानतळ सुरक्षादलाने कारवाई केली. धावपट्टीवर गस्त वाढविण्यात आली आणि सर्व विमानांच्या हालचाली काही काळासाठी नियंत्रित करण्यात आल्या. नुकत्याच वाढलेल्या विमानवाहतुकीमुळे आणि धावपट्टीवरील नियमित हालचालींमुळे अशी घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे.

बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पिंजरा लावण्याची केली मागणी

वनविभागाकडून विशेष कारवाई

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळ परिसराची पाहणी केली असून, बिबट्या शिरकाव कुठून झाला याचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे. परिसराभोवतीच्या कुंपणांची तपासणी, सापळे लावणे तसेच रात्रीच्या वेळी कॅमेऱ्याद्वारे गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे तिथे काय उणे! मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन; मोठा धोका टळला

 

वनविभागाचे अधिकारी म्हणाले की, विमानतळ परिसरात वन्यप्राणी आढळणे अत्यंत अपवादात्मक आहे मात्र आसपास असलेल्या मोकळ्या जागेमुळे आणि डोंगराळ पट्ट्यामुळे कधीकधी या प्राण्यांचा वावर होऊ शकतो. सुरक्षा दृष्टीने विमानतळ प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन

पुणे विमानतळाच्या धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी विमानांची सर्वाधिक वाहतूक असतानाच बिबट्या पार्किंग बे क्रमांक ८, ९ आणि १० पासून काहीच अंतरावर दिसला.
वन विभागाच्या सूचनांकडे विमानतळ प्रशासनाचे दुर्लक्षयापूर्वीच्या घटनेनंतर वन विभागाने विमानतळ प्रशासनाला लोहगावच्या दिशेने असलेल्या संरक्षणभिंतीची डागडुजी तातडीने करण्याचे पत्र दिले होते. मात्र, अद्यापही भिंत दुरुस्तीअभावी तशीच असून, या भिंतीतूनच बिबट्या विमानतळ परिसरात येत असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. के-४ परिसरातील भुयारी ड्रेनेज पाइपला जाळ्या बसवून मार्ग बंद करण्यात आला आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी लोहगाव परिसरात पिंजरे लावण्यात आले असून, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून त्याच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जात आहे.

Web Title: Major changes in security protocols at pune airport due to leopard scare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:43 PM

Topics:  

  • Forest Department
  • Leopard
  • Pune Airport

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन
1

Ahilyanagar News: बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्तसंचार, खडकीमध्ये दहशत! दिवस वीजपुरवठ्याचे महावितरणला दिले निवेदन

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश
2

Sangli News : शिराळा तालुक्यातील बिऊरमधील नरभक्षक बिबट्या अखेर जेरबंद; वनविभाग व रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांना यश

मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून उपक्रम; आपत्तकालीन दलास विशेष प्रशिक्षण
3

मानव–बिबट संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून उपक्रम; आपत्तकालीन दलास विशेष प्रशिक्षण

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….
4

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.