• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Leopard Sighting In Baramati Taluka Has Created Fear Among Citizens

बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पिंजरा लावण्याची केली मागणी

बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2025 | 02:07 PM
बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण; पिंजरा लावण्याची केली मागणी

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • बारामती तालुक्यात बिबट्याचा वावर
  • नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
  • पिंजरा लावण्याची केली मागणी
बारामती : बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्तपणे संचार आढळल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. वनविभागाने निरावागस परिसरातील येळे वस्ती या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा यासाठी कार्यान्वित केल्यानंतर या सीसीटीव्ही मध्ये बिबट्या कैद झाला असून, यामध्ये बिबट्याने एका कुत्र्याचा फडशा पाडल्याचा फुटेज आढळून आल्याने नागरिक आणखी घाबरले आहेत.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांकडून सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी करूनही वनविभाग पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानग्यांची आवश्यकता असल्याचे सांगून चालढकल करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील देवकाते यांनी वन विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत नागरिकांचा जीव बिबट्या घेण्याची वाट वन विभाग पहात आहे का? असा सवाल व्यक्त करत या दोन दिवसांमध्ये वन विभागाने तातडीने पिंजरा बसवावा, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन उभे करू, असा इशारा त्यांनी नवराष्ट्रशी बोलताना दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नरसह अन्य भागामध्ये बिबट्यांचे प्रमाण वाढले असून, अनेक ठिकाणी बिबट्या दर्शन देत असल्याने त्या भागातील नागरिक चिंतेत आहेत. त्यातच दौंड तालुक्यातदेखील बिबट्या आढळल्याने त्या भागातही ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बारामती तालुक्यातील निरावागज परिसरामध्ये येळे वस्ती या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बिबट्या आढळत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर, वनविभागाने बिबट्याच्या ठशांची तपासणी करून, या परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवली. यामध्ये बिबट्या आढळून आला.

ऊस गाळपाचा हंगाम सुरू

येळेवस्ती येथे संतोष कुंभार यांनी आपल्या घराच्या भोवती सीसीटीव्ही यंत्रणा बसवलेली आहे. यामध्ये देखील बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणखीनच घाबरले आहेत. वनविभागाने या भागातील बिबट्या अन्य भागात दूरवर गेल्याचे स्थानिकांना सांगून चालढकल करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी पुन्हा निरावागज परिसरात बिबट्या आढळून आल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी या भागात वनविभागाने पिंजरा बसवून बिबट्याला पकडावे, अशी मागणी वन विभागाकडे केली आहे.

बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा

दरम्यान सध्या साखर कारखान्यांचा ऊस गाळपाचा हंगाम सुरू आहे. या भागामध्ये उसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पहाटे अथवा रात्रीच्या वेळी उसाला पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. मात्र या बिबट्यामुळे भर दिवसा देखील शेतात जाण्यास शेतकरी घाबरत आहेत. ऊस तोडणीसाठी मजुरांबरोबर त्यांची लहान मुले देखील असतात, अशावेळी बिबट्याने हल्ला केल्यास यामध्ये लहान मुलांचा अथवा नागरिकाचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सुनील देवकाते यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Leopard sighting in baramati taluka has created fear among citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • baramati
  • Leopard
  • Leopard Attack

संबंधित बातम्या

निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत…, कुठे झाले दर्शन?
1

निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत…, कुठे झाले दर्शन?

Karjat News : कर्जतमध्ये बिबट्याचा वावर ; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2

Karjat News : कर्जतमध्ये बिबट्याचा वावर ; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
3

बारामतीतील कृषी प्रदर्शनात गर्दी; तरुण शेतकरी, महिला वर्गांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

‘या’ 5 सेफ्टी फीचर्सच्या जोरावरच तर Tata Punch मार्केटमध्ये इतक्या उड्या मारते

Jan 22, 2026 | 10:12 PM
Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Palash Muchhal: स्मृती मानधनासोबत विवाह मोडल्यानंतर पलाश मु्च्छलचा सांगलीत कांड! तरुणाची ४० लाखांची फसवणूक केल्याचा आरोप

Jan 22, 2026 | 09:43 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

T20 World Cup 2026 : बांगलादेशच्या माघारीने पाकिस्तान अशांत! स्पर्धेच्या वेळापत्रकात होणार मोठे बदल? वाचा सविस्तर 

Jan 22, 2026 | 09:39 PM
Mahabaleshwar नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड

Mahabaleshwar नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी नासिरभाई मुलाणी यांची बिनविरोध निवड

Jan 22, 2026 | 09:38 PM
पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

पाचगणी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी प्रकाश गोळे; स्वीकृत नगरसेवक पदी अनिता चोपडे व गणेश कासुर्डे यांची वर्णी

Jan 22, 2026 | 09:38 PM
“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

“मुंबई महापालिकेने केईएमचे किंग एडवर्ड नाव बदलण्याचा…”; Mangal Prabhat Lodha यांची मागणी काय?

Jan 22, 2026 | 09:25 PM
भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, करण जोहर झाला भावुक; म्हणाला…

भारताच्या पदरी निराशा! Homebound ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर, करण जोहर झाला भावुक; म्हणाला…

Jan 22, 2026 | 09:25 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Ratnagiri News : लोटेतील लक्ष्मी अग्रो (पिपास) कंपनीविरोधात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

Jan 22, 2026 | 06:35 PM
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.