Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…

पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 05, 2025 | 05:43 PM
Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…

Pune Leopard Attack: तीन जणांचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या ठार; शार्प शूटर पथकाने थेट…

Follow Us
Close
Follow Us:

पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्या ठार
शार्प शूटर पथकाने झाडल्या गोळ्या
ग्रामस्थांना मिळाला मोठा दिलासा

पारगाव शिंगवे / शिक्रापूर: पिंपरखेड परिसरात मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या नरभक्षक बिबट्या अखेर ठार करण्यात आला. पारगाव शिंगवे व पिंपरखेड परिसरात नागरिकांवर हल्ले करणाऱ्या या बिबट्याला मंगळवारी (दि. ४) रोजी रात्री साडेदहाच वाजताच्या सुमारास शार्प शूटर पथकाने गोळ्या झाडून ठार केले. या नरभक्षक बिबट्याचे वय अंदाजे चार ते पाच वर्षे असल्याचे वनविभागाने सांगितले. या घटनेनंतर परिसरात मोठा दिलासा व्यक्त करण्यात आला असून मृत बिबट्याचे शव ग्रामस्थांना दाखविण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे नेण्यात आले.

पिंपरखेड परिसरात गेल्या २० दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांमुळे शिवन्या शैलेश बोंबे, भागुबाई रंगनाथ जाधव आणि रोहन विलास बोंबे या तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन आणि माणसांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
वनविभागावर निष्क्रियतेचे आरोप होत होते. भीतीच्या छायेत जगणाऱ्या नागरिकांनी जुन्नर, शिरूर, आंबेगाव व खेड परिसरात रास्तारोको आणि आंदोलन करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. “या परिसरात आता बिबटे नकोत,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली होती.

Leopard News: ‘या’ तालुक्यांत मानव-बिबट्या संघर्षाची परिस्थिती गंभीर; अजित पवारांनी घेतला ‘हा’ निर्णय

वनविभागाची तातडीची मोहीम

या नरभक्षक बिबट्यास जेरबंद किंवा ठार करण्यासाठी पुणे जिल्हा वनसंरक्षक   आशिष ठाकरे यांनी तातडीने प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक महाराष्ट्र राज्य नागपूर यांची परवानगी घेतली. त्यांनतर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रेस्क्यू संस्थेचे पशु चिकीत्सक डॉ. सात्विक पाठक,  शार्प शूटर जुबिन पोस्टवाला व डॉ. प्रसाद दाभोळकर या दोन शार्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात करून नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू केली होती.

भ्रमणमार्गाचे निरीक्षण व थर्मल ड्रोनचा वापर

बिबट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. दिवसभर ठशांचे निरीक्षण केल्यानंतर रात्री तीन थर्मल ड्रोनच्या साहाय्याने शोधमोहीम राबवण्यात आली. संध्याकाळी घटनास्थळापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट्या दिसून आला. त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्यात आला; मात्र तो निष्फळ ठरला. यानंतर बिबट्या आक्रमक होऊन प्रति-हल्ला करत असताना शार्प शूटरने गोळी झाडली आणि रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या ठार झाला.

Pune News: “जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे…”;काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?

यशस्वी मोहिमेमागे वनविभागाचे सहकार्य

ही मोहीम वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस. अमृत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी  निळकंठ गव्हाणे, तसेच रेस्क्यू संस्थेचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने यशस्वी झाली.

Web Title: Man eating leopard killed three people pimperkhed killed junnar shikrapur pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 05:42 PM

Topics:  

  • Leopard
  • Leopard Attack
  • pune news

संबंधित बातम्या

आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video
1

आला रे आला! सावजाच्या मागे आला बिबट्या अन्…; अंगणात बसलेला चिमुकला बचावला, पहा थरारक Video

Pune News: पुण्यात त्रिपुरारी पौर्णिमेचा मोठा उत्साह! श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अन्नकोटात ५२१ पदार्थांचा महानैवेद्य
2

Pune News: पुण्यात त्रिपुरारी पौर्णिमेचा मोठा उत्साह! श्रीमंत दगडूशेठ गणपतीला अन्नकोटात ५२१ पदार्थांचा महानैवेद्य

Pune News: “जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे…”;काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?
3

Pune News: “जुन्नर व शिरूर परिसरातील बिबट्यांचे…”;काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम
4

आंबेगाव-जुन्नरच्या बैठकीवर ग्रामस्थांचा बहिष्कार; नरभक्षक बिबट्याचा प्रश्न कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.