Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati byelection 2026 : बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; सुनेत्रा पवारांविरोधात ‘इतके’ उमेदवार रिंगणात

बारामती पोटनिवडणूक राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले, त्यांच्या या प्रयत्नानुसार ३० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. मात्र २३ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत,

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 09, 2026 | 06:33 PM
बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; सुनेत्रा पवारांविरोधात 'इतके' उमेदवार रिंगणात

बारामती पोटनिवडणुकीत नवा ट्वीस्ट; सुनेत्रा पवारांविरोधात 'इतके' उमेदवार रिंगणात

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेमुळे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसकडून ॲड आकाश विजयराव मोरे यांचा दाखल केलेला अर्ज अखेर मागे घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची भेट घेऊन त्यांच्या मध्यस्थीने उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राष्ट्रवादीकडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले, त्यांच्या या प्रयत्नानुसार ३० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. मात्र २३ उमेदवारी अर्ज कायम राहिले आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

 

बारामती विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीमध्ये ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे उमेदवारी अर्ज दाखल करणार होते, मात्र उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मध्यस्थीने हाके यांची समजूत काढण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील हाके यांना फोन करून उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोन व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेली मध्यस्थी यामुळे हाके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसचे ॲड आकाश मोरे हे आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याचे घोषित करून त्यांचा उमेदवारी अर्ज देखील दाखल झाला. कोणत्याही परिस्थितीत आम्हीही निवडणूक लढवू, अशी भूमिका सपकाळ यांनी घेतली होती. दरम्यान दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संशयित अपघात प्रकरणी फिर्याद बारामती पोलिसांनी दाखल करून घेतल्यास आम्ही या निवडणुकीतून माघारी घेणार असल्याचे सपकाळ यांच्यासह काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी म्हटले होते. मात्र आज आमदार रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आला.

दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाच्या नवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह ५३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे प्रयत्न सुरू केले होते. खासदार पार्थ पवार, जय पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रयत्नात होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने ३० उमेदवारांची माघार घेण्यात राष्ट्रवादीला यश आले, मात्र २३ उमेदवारांचे अर्ज राहिल्याने, बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक अखेर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात करुणा मुंडे, अभिजीत बिचकुले यांच्यासह अन्य २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

हे सुद्धा वाचा : भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Web Title: Many candidates are contesting against sunetra pawar in the baramati by election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • baramati
  • Election News
  • Sunetra ajit Pawar

संबंधित बातम्या

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग
1

भोर तालुक्यात 26 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी; पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

Baramati Byelection : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँग्रेसकडून आकाश मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल
2

Baramati Byelection : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाहीच; काँग्रेसकडून आकाश मोरेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Baramati By Election: सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थित
3

Baramati By Election: सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थित

बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश
4

बारामती पोटनिवडणुकीसाठी हालचालींना वेग; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.