
महाराष्ट्रातील १०६ विद्यार्थ्यांचा सहभाग
स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद जीवन ज्योत संस्थेचे अशोक शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संस्थेचे सचिव श्रीकांत कुलकर्णी, खजिनदार सतीश टंकसाळे, अखिल मराठी प्रज्ञाचक्षू बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष संजय घोडेराव, खजिनदार प्रवीण राठी, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आर्यन जोशी, सीए माखनलाल अग्रवाल, अलायन्स क्लब पुणेचे राजीव वाखले तसेच रोटरी क्लब पुणे डाउनटाउनचे प्रतिनिधी उपस्थित होते.’
Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते
मुंबई, नांदेड, सोलापूर, अमरावती यांसह महाराष्ट्रातील विविध भागांतून मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकूण १०६ विद्यार्थ्यांनी बुद्धिबळाच्या पटावर आपले कौशल्य पणाला लावत स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून धनाजी काकडे यांनी काम पाहिले. जितेंद्र वाळिंबे आणि ऋषिकेश गायकवाड यांनी उपपंच म्हणून जबाबदारी सांभाळली.
स्पर्धेच्या अंतिम निकालात छत्रपती संभाजीनगरच्या गौरव फुलसुंदरने प्रथम क्रमांक पटकावला. भोसरी, पुणे येथील बाबासाहेब वागमारे यांनी द्वितीय, तर भोसरीच्याच प्रणव जयभाय यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण समारंभात प्रमाणपत्रे, ट्रॉफी आणि रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. साधना गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आत्मविश्वासाला मिळाले बळ
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना बुद्धिबळाच्या माध्यमातून आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी ठरली. बुद्धिबळाच्या माध्यमातून त्यांच्या क्रीडागुणांना वाव मिळण्याबरोबरच स्पर्धात्मक वृत्ती, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास विकसित होण्यासही मदत झाली.
Chess Tournament : मुंबई महापौर चषक शालेय बुद्धिबळ स्पर्धा 24 ऑक्टोबरपासून; 135 पुरस्कारांची लयलूट!
सिद्धांत साळुंखेने पटकावले आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद
शिवभूमी शिक्षण ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित शिवभूमी आंतरराष्ट्रीय खुल्या फिडे रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या सिद्धांत साळुंखे याने अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. कात्रज येथील आरोह गार्डन मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत नवव्या फेरीत पहिल्या पटावरील लढतीत सिद्धांत साळुंखे याने अखिलेश नगारेचा पराभव करून ८.५ गुणांसह विजेतेपद पटकावले.
Ans: आळंदी देवाची येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धा संपन्न झाली.
Ans: स्पर्धेच्या अंतिम निकालात छत्रपती संभाजीनगरच्या गौरव फुलसुंदरने प्रथम क्रमांक पटकावला.