Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास दिल्यास…”; मंत्री उदय सामंत यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. या विरोधकांच्या वक्तव्यावर सामंत यांनी यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 24, 2024 | 09:53 PM
"महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास दिल्यास..."; मंत्री उदय सामंत यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

"महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास दिल्यास..."; मंत्री उदय सामंत यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महाराष्ट्रात उद्योगांना कुणी त्रास देत असेल तर त्यावर कारवाई करू. सर्व उद्योगांना संरक्षण देण्याचे आमचं काम आहे. राज्यभर उद्योग भवन उभारण्याचं काम हाती घेणार आहोत. गडचिरोली सारख्या जिल्हयात अनेक कंपन्या आणल्या. मराठवाड्यात देखील अनेक गुंतवणुकी आम्ही आणल्या आहेत. संभाजी नगरध्ये अनेक प्रकल्प आम्ही आणले आहेत. पुणे, गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण डोंबिवली या जिल्ह्याला टाटा समूहाकडून सीआरएसमधून ५०० कोटी रुपयांचे प्रकल्प होत आहेत, अशी  माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाराष्ट्रातील उद्योगाबाबत पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत. या विरोधकांच्या वक्तव्यावर सामंत यांनी यावेळी निशाणा साधला. ते म्हणाले, विरोधकांनी फेक नरेटिव्ह सेट केला होता. कुठलेच उद्योग राज्याबाहेर गेले गेले नाहीत. त्यांच्या काळात काम झाल नाही. म्हणुन हे प्रकल्प बाहेर गेले. चर्चा न झाल्याने त्यांच्या काळात एयर बस हा प्रकल्प गेला. याबाबत व्हाईट पेपर का काढला नाही असं सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाने बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आल्याने राज्यातील वातावरण तापलं आहे. मुंबईत, महाराष्ट्रात राहूनही मराठी माणसांना अतिशय तुच्छ वागणूक देणारे अनेक प्रकार यापूर्वीही घडले असून असाच प्रकार पुन्हा घडल्याने मराठी माणूस महाराष्ट्रातच असुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचे अधिवेशनातही पडसाद उमटले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाबाबत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. तर अशा लोकांचा कडेकोट बंदोबस्त केला जाईल, असा इशाराही उदय सामंत यांनी  यावेळी दिला.

आज पुणे शहरात उद्योग व मराठी भाषा मंत्री पदी निवड झाल्याने जल्लोषात स्वागत केले. तसेच माझ्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देत वाढदिवस साजरा केला. यावेळी शहर संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भांगीरे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.#pune… pic.twitter.com/BMdALoyJvc — Uday Samant (@samant_uday) December 24, 2024

महाविकास आघाडीचे सरकार 2022 मध्ये पडल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळेस महविकास आघाडीने राज्यातील उद्योगधंदे राज्याच्या बाहेर जात असल्याचा आरोप केला होता. तसेच हे सर्व उद्योग गुजरातला नेले जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र वारंवार महायुती सरकारने एकही उद्योग राज्याचा बाहेर गेला नसल्याचे स्पष्ट केले. आता पुन्हा एकदा रजत संपूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे उद्योग मंत्री सर्व उद्योगांना संरक्षण देण्याबाबत तसेच कोणी त्रास दिल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

‘पुण्याचा महापौर आमच्या विचाराशिवाय होणार नाही’

आमच्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले आहेत आणि फ्लॅट सुद्धा दिले आहेत. आमच्या मध्ये बंगल्यावरून वाद होणारं नाही हे नक्की आहे. शिवसेना पुणे महानगरपालिकेत सत्तेत येईल असेच काम करू. पुण्याचा महापौर आमच्या विचाराशिवाय होणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तानाजी सावंत मला सिनियर आहेत. मुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करतील त्यांची नाराजी नक्की दूर करू. एकनाथ शिंदे कुटुंबप्रमुख आहेत बीड आणि परभणी बद्दल बाकीच्यांचं मला माहिती नाही. आम्हीं शेवटच्या आरोपींपर्यंत पोहोचू, त्यांना नक्की न्याय मिळेल, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.

Web Title: Minister uday samant said take action against anyone troubling industrial projects in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 09:53 PM

Topics:  

  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: घरात घुसून तलवारीने वार, महिला आणि मुलगा गंभीर जखमी; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर
1

Pune Crime: घरात घुसून तलवारीने वार, महिला आणि मुलगा गंभीर जखमी; घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज
2

Navarashtra Special: सौंदर्यवर्धनाच्या आड पर्यावरणाला धोका: कोनोकोर्पस झाडांवर बंदीची गरज

Pune Metro: ‘आपली मेट्रो’ला पुणेकरांनी दिले भरभरून प्रेम; केवळ ‘इतक्या’ वर्षांत १० कोटी प्रवाशांनी केला प्रवास
3

Pune Metro: ‘आपली मेट्रो’ला पुणेकरांनी दिले भरभरून प्रेम; केवळ ‘इतक्या’ वर्षांत १० कोटी प्रवाशांनी केला प्रवास

Pune Crime: ड्यूटीवरून घरी जाणाऱ्या पोलिसावर कोयत्याने वार, पुण्यातील लॉ कॉलेजरोड वरील घटना
4

Pune Crime: ड्यूटीवरून घरी जाणाऱ्या पोलिसावर कोयत्याने वार, पुण्यातील लॉ कॉलेजरोड वरील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.