Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: गोळीबार, आरडाओरडा अन् तळ्यात उडी… शिरूरमध्ये मध्यरात्रीचा थरार

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करडे गावात जुन्या वादातून एका 23 वर्षीय तरुणावर मध्यरात्री गावठी पिस्तुलातून तीन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तरुणाने प्रसंगावधान राखत तळ्यात उडी मारून पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर जात जीव वाचवला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 19, 2026 | 01:37 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • करडे गावात मध्यरात्री तरुणावर तीन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न.
  • तळ्यात उडी मारून पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर गेल्याने तरुणाचा जीव वाचला.
  • पोलिसांनी चार नामनिर्देशित व तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली.
पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील करडे गाव पुन्हा एकदा मध्यरात्री झालेल्या गोळीबारामुळे हादरून गेले आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी करडे घाटातील हत्याकांडाची चर्चा सुरू असतानाच, सात ते आठ जणांच्या टोळक्याने एका 23 वर्षीय तरुणावर सलग तीन गोळ्या झाडून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाने शेजारच्या तळ्यात उडी घेत पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचत मृत्यूच्या दाढेतून स्वतःची सुटका केली. या थरारक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या गोळीबाराच्या घटनांमुळे शिरूर तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर…

काय नेमकं प्रकरण?

शुक्रवारी मध्यरात्री सुमारे १.३० वाजता करडे गावातील भैरवनाथ मंदिराशेजारील स्मशानभूमीजवळ संशयितांनी निखिल थेऊरकर याला बोलावून घेतले. जुन्या व्यवहाराच्या कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादातून संशयित आदित्य लंघे व त्याच्या साथीदारांनी गावठी पिस्तुलातून निखिलवर सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकवत निखिल थेऊरकर यांनी शेजारील तळ्यात उडी घेतली. पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ते घटनास्थळावरून पसार झाले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर शनिवारी सकाळी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी आदित्य लंघे (रा. करडे), बबलू सोनवणे (रा. सिंहगड रोड, पुणे), टिन्न्या शेळके (रा. रांजणगाव), रोहन पंचमुखी (रा. करडे) आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच शस्त्र अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी दिली.

पुण्यात गॅलरीतून उडी मारून मुलीची आत्महत्या; घरातील सर्वजण झोपले अन्…

राज्यासह देशभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. इमारतीच्या पाचव्या माजल्यावरून उडी मारून एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना धनकवडी येथील निर्मल पार्क सोसायटीत गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Satara News: साताऱ्यात थरार! फॅक्टरीतील जळत्या भट्टीत कामगाराची उडी; आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करडे गावात.

  • Que: तरुणाने स्वतःचा जीव कसा वाचवला?

    Ans: तळ्यात उडी मारून पोहत दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊन.

  • Que: पोलिसांनी कोणता गुन्हा दाखल केला आहे?

    Ans: जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा.

Web Title: Pune crime gunshots shouting and a leap into the lake midnight drama in shirur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Satara News: साताऱ्यात थरार! फॅक्टरीतील जळत्या भट्टीत कामगाराची उडी; आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल
1

Satara News: साताऱ्यात थरार! फॅक्टरीतील जळत्या भट्टीत कामगाराची उडी; आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Crime: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् पतीचे अनैतिक संबंध; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
2

Nagpur Crime: चारित्र्यावर संशय, हुंड्यासाठी छळ अन् पतीचे अनैतिक संबंध; विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Kalyan Crime: प्रेयसीसमोर ‘पेंद्या भाई’चा The End…! 16 वार करून निर्घृण हत्या; 36 तासांत आरोपी जेरबंद
3

Kalyan Crime: प्रेयसीसमोर ‘पेंद्या भाई’चा The End…! 16 वार करून निर्घृण हत्या; 36 तासांत आरोपी जेरबंद

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील
4

Mumbai Crime: 8 वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराच्या लग्नाची बातमी समजताच तरुणीची आत्महत्या; शेवटची इच्छा वाचून डोळे पाणावतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.