Mumbai Railway Demolition: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
सकाळीच बुलडोझर आला- मुंबईतल्या प्रभादेवी परिसरात पश्चिम रेल्वेने तोडक कारवाई सुरू केलीय. शुक्रवार, ता. 20 पासून ही कारवाई चालू आहे. प्रभादेवी स्टेशन जवळच्या 101 अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवलं जातंय. सकाळपासूनच परिसरात गोंधळाचं वातावरण आहे.
लोकांनी आंदोलन केलं- या कारवाईला विरोध करत तिथल्या लोकांनी निदर्शनं केली. आम्हाला कुठे जायचं, असा सवाल लोक विचारत होते. गोंधळ होऊ नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावलाय. पोलीस प्रत्येक गल्लीत उभे आहेत.
रेल्वेचं म्हणणं काय?- पश्चिम रेल्वेचं म्हणणं आहे की, ही जागा रेल्वेची आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वेच्या कामासाठी ही जागा मोकळी करणं गरजेचं आहे. म्हणून ही कारवाई केली जातेय. रेल्वेने आधीच नोटीस दिली होती, असं पण सांगितलं जातं.
50-60 वर्षांपासून राहणारी कुटुंबं- या कारवाईमुळे सगळ्यात जास्त फटका बसलाय तो तिथे गेली 50 ते 60 वर्षं राहणाऱ्या कुटुंबांना. त्यांचं सगळं सामान बाहेर काढलं गेलंय. अनेक कुटुंबांवर आता बेघर होण्याची वेळ आलीय. लहान मुलं, म्हातारी माणसं सगळी रस्त्यावर आलीत. लोकांच्या डोळ्यात पाणी होतं.
घरातलं सामान बाहेर- झोपडी पाडताना लोक आपलं भांडं, कपडे, टीव्ही, फ्रिज सगळं बाहेर काढत होते. काहींनी सामान रस्त्यावर ठेवलंय. कुठे ठेवायचं हेच कळत नव्हतं. काही महिलांनी हात जोडून विनंती केली, पण कारवाई थांबली नाही.
स्टाफ क्वार्टर्स बांधणार- रेल्वे प्रशासनाने प्रभादेवीतली 100 अतिक्रमणं हटवायची मोहीम आखलीय. ही जमीन रेल्वेच्या मालकीची आहे. तिथे पश्चिम रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी राहायला घरे म्हणजे स्टाफ क्वार्टर्स बांधायची योजना आहे. त्यासाठीच ही जागा मोकळी केली जाते.