Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर सत्तेतून बाहेर पडण्याचेही धाडस दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2026 | 05:02 PM
भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर...; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर...; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

Follow Us
Follow Us:

पुणे : भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर सत्तेतून बाहेर पडण्याचेही धाडस दाखवावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला लगावला आहे. भाजपच्या विरोधात जाणे सोपे नसताना सत्तेत राहून धाडस दाखवले असेल, तर त्याचे स्वागत आहे; मात्र पुढे काय होते, हे पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. पेपरफुटीच्या प्रश्नावर प्राध्यापक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित कार्यक्रमानंतर पवार पत्रकारांशी बोलत होते.

एमपीएससी पेपरफुटी आणि परीक्षांमधील भ्रष्टाचारामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अधिकारी, अभियंता होण्यासाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी कार्यक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याबाबत पवार म्हणाले, “त्या पक्षाच्या प्रमुख आहेत. त्यांना कोणी भेटायचे हा त्यांचा प्रश्न आहे. प्रशांत किशोर यांना भेटण्यात दुसऱ्यांच्या पोटात दुखण्याचे कारण काय?” भाजप नाराज होईल हे माहीत असतानाही भेट झाली असेल, तर ते धाडस आहे. मात्र प्रशांत किशोर यांना भेटणे महागात पडू शकते. चांगली गोष्ट स्वीकारण्यासाठी काही गोष्टी पचवाव्या लागतात, असे पवार यांनी सांगितले.

अर्थमंत्रिपद अजित पवार गटाला मिळणार का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा मुंबईत असताना त्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट नाकारली असेल, तर एवढे महत्त्वाचे खाते मिळेल, असे वाटत नाही. अर्थखाते मिळाल्यास महत्त्वाच्या नाड्या हातात येतात, त्यामुळे भाजपला ते नको असावे, असा दावा त्यांनी केला. डिलिमिटेशनच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व आठ खासदार मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदारसंघांची फेररचना ही प्रभाग फोडण्यासारखी झाली तर देशात लोकशाही राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठा आरक्षणासाठी संसदेत घटनात्मक बदल करणे आवश्यक असून, केवळ आंदोलन किंवा राजकीय आश्वासनांनी आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे पवार म्हणाले. आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन समाजांत तेढ निर्माण करून भाजपने राजकीय फायदा घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. तुकाराम मुंढे चांगले काम करत असले तरी केवळ एका अधिकाऱ्याला पुढे करून सरकारच्या इतर विभागांचे अपयश झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जनतेच्या प्रश्नांवर सरकारकडून निर्णय करून घ्यायचे असतील तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा : सराईत वाहनचोराला ठोकल्या बेड्या, 6 दुचाकी जप्त; विश्रांतवाडी पोलिसांची मोठी कारवाई

Web Title: Mla rohit pawar has criticized ajit pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 05:02 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • MLA Rohit Pawar
  • Sunetra Pawar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.