Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास

हिंजवडी ते शिवाजीनगर (मान ते डिस्ट्रिक्ट कोर्ट) मेट्रो लाईन ३ च्या कामाची पाहणी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. यावेळी टाटा आणि सिमेन्स कंपनीचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 01:37 PM
आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास

आमदार शिरोळेंकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) कामाची पाहणी; २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा व्यक्त केला विश्वास

Follow Us
Follow Us:
  • हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) चे काम वेगाने सुरु
  • आमदार शिरोळेंकडून कामाची पाहणी
  • २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा विश्वास
पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर (मान ते डिस्ट्रिक्ट कोर्ट) मेट्रो लाईन ३ चे काम वेगाने सुरु आहे. या कामाची पाहणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली. यावेळी टाटा आणि सिमेन्स कंपनीचे अधिकारी व अभियंते उपस्थित होते. यावेळी शिरोळे यांनी २०२६ मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणेकरांचा महत्त्वाचा वाहतूक प्रश्न सोडवण्यासाठी २०२२ मध्ये सुरू झालेल्या या २३ स्टेशनच्या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मान ते राम नगर दरम्यानची १२ स्टेशन्स पूर्णपणे तयार झाली आहेत आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील एकूण ७ स्टेशनपैकी (आयसर, सकाळ नगर, युनिव्हर्सिटी, भोसले नगर, मॉडेल कॉलनी, शिमला ऑफिस आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट) ५ स्टेशनचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. पुढील २ ते ३ महिन्यांत आवश्यक मंजुऱ्या (क्लिअरन्स) मिळतील अशी अपेक्षा असून, २०२६ मध्ये मान ते थेट डिस्ट्रिक्ट कोर्ट (शिवाजीनगर) असा सलग प्रवास पुणेकरांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.

पुण्याच्या प्रवेशद्वारावर गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीतून या प्रकल्पामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहे. २०२६ मध्ये ही मेट्रो सेवा पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल असा आम्हाला विश्वास आहे,  असे सिद्धार्थ शिरोळे म्हणाले.

हे सुद्धा वाचा : जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो (लाईन ३) च्या उद्घाटनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाईल. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. प्रशासकीय पातळीवर पीएमआरडीए आणि ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि.’ (पीआयटीसीएमआरएल) कडून तयारीचा वेग वाढवण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात, शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

Web Title: Mla siddharth shirole inspected the work on the hinjawadi to shivajinagar metro line 3 project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • metro news
  • MLA Siddharth Shirole
  • Pune Metro

संबंधित बातम्या

वाहतूक कोंडीचा ‘द एंड’! लवकरच ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता
1

वाहतूक कोंडीचा ‘द एंड’! लवकरच ‘या’ मार्गावर धावणार मेट्रो; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता
2

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो ३ चे उद्घाटन लांबणीवर; आता एकाच वेळी १६ स्थानके सुरू होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.