Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळला पुन्हा ‘लाल दिवा’ मिळणार? आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण

मावळच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 05:53 PM
मावळला पुन्हा ‘लाल दिवा’ मिळणार? आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण

मावळला पुन्हा ‘लाल दिवा’ मिळणार? आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय चर्चेला उधाण आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मावळ तालुक्याला पुन्हा एकदा ‘लाल दिवा’ मिळणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार, पक्षांतर्गत बदल आणि आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर शेळके यांच्या नावाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याची चर्चा आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महत्त्वपूर्ण फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यात शेळके यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. सध्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी अण्णा बनसोडे यांच्याकडे आहे. मात्र पक्षाला प्रभावी आणि जनाधार असलेल्या नेतृत्वाला संधी द्यायची असल्याने नवीन जबाबदाऱ्यांबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

मावळच्या राजकीय इतिहासात काँग्रेसचा एकेकाळी मोठा प्रभाव होता. त्यानंतर भाजपने बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात मजबूत संघटन उभे केले. भेगडे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर मावळला राज्याच्या राजकारणात विशेष ओळख मिळाली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये आपले अस्तित्व वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनील शेळके यांच्यावर विश्वास ठेवत उमेदवारी दिली आणि त्या निर्णयाने मावळच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली. पहिल्याच निवडणुकीत शेळके यांनी तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव करत राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांनी आपले वर्चस्व कायम राखले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले. लोणावळा नगरपरिषद, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, वडगाव नगरपंचायत तसेच पंचायत समित्यांमध्ये पक्षाची मजबूत सत्ता उभी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडे त्यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा आहे.

हे सुद्धा वाचा : ‘पीएमआरडीए’चा वाहतूककोंडीवर सर्जिकल स्ट्राईक; 45 कोटी खर्चून 17 चौकांचा होणार कायापालट

मावळच्या राजकीय इतिहासात यापूर्वी मदन बाफना आणि बाळा भेगडे या नेत्यांना मंत्रीपदाचा मान मिळाला होता. आता सुनील शेळके यांच्या नावाची मंत्रीपदासाठी चर्चा रंगू लागल्याने तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी “मावळला पुन्हा लाल दिवा मिळणार का?” हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

Web Title: Mla sunil shelke is likely to get a ministerial berth from ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 05:53 PM

Topics:  

  • maval news
  • NCP News
  • Sunil Shelke

संबंधित बातम्या

भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव
1

भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार, मृत्यूनंतरही मरणयातना; मावळातील ऑर्डव गावातील विदारक वास्तव

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी
2

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.