
पुणे शहरातील मेट्रोच्या नवीन मार्गिकेला मंजूरी
मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून ट्वीट करत अभिनंदन
मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी मोहोळ यांनी केला होता पाठपुरावा
पुणे: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पुणे मेट्रोच्या ३१.६ किलोमीटर अंतराच्या दोन विस्तारित मार्गिकांना मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे मेट्रो शहराच्या चारही बाजूला विस्तारणार असून पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेगवान होणार आहे.
बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात मार्गिका क्रमांक 4 – खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला व मार्गिका क्रमांक 4 अ नळस्टॉप-वारजे-माणिकबाग या दोन मार्गिकांचा समावेश आहे. या दोन्ही मार्गिकांसाठी हडपसर हे इंटरचेंज स्थानक असेल. या दोन्ही उन्नत (एलिव्हेटेड) मार्गिकांची एकत्रित लांबी ३१.६० किलोमीटर असून त्यावर एकूण २८ स्थानके असतील. यासाठी ९८५७ कोटी ८५ लाख रुपये खर्च अपेक्षित असून हे काम पाच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
काय म्हणाले मंत्री मुरलीधर मोहोळ?
पुण्यासाठी खराडी-खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४अ) मार्गांनी मोदी सरकारची मंजुरी ! पुणे मेट्रो रेल नेटवर्कच्या फेज-२ अंतर्गत लाइन ४ (खडकी–खडकवासला) आणि लाइन ४अ (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये ₹९,८५७.८५ कोटींची तरतूद असून, पुढील ५ वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.
Good News, Punekars ! पुण्यासाठी खराडी-खडकवासला (मार्गिका ४) आणि नळ स्टॉप-वारजे-माणिकबाग (मार्गिका ४अ) मार्गांनी मोदी सरकारची मंजुरी ! पुणे मेट्रो रेल नेटवर्कच्या फेज-२ अंतर्गत लाइन ४ (खडकी–खडकवासला) आणि लाइन ४अ (नळ स्टॉप–वारजे–माणिक बाग) या दोन्ही मार्गांना मंजुरी मिळाली आहे.… pic.twitter.com/ikw5JR1ueT — Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) November 26, 2025
या मार्गांना मंजुरी मिळावी यासाठी नुकतीच केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या विस्तारामुळे ३१.६ किमीचे नवे नेटवर्क, २८ एलिव्हेटेड स्टेशन तयार होतील ज्यामुळे IT हब, व्यावसायिक परिसर, कॉलेजेस आणि प्रमुख निवासी भागांना अधिक वेगवान कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. नवीन लाईन्समुळे खडकी, नळस्टॉप, वारजे, माणिक बाग आणि डेक्कन–स्वारगेट परिसराला प्रचंड फायदा होणार असून पुणेकरांसाठी ही खरोखरच मोठी Good News आहे ! या मंजुरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समस्त पुणेकरांच्या वतीनं मनःपूर्वक धन्यवाद !