पुणे : कोथरूड भागातील विविध चौकामध्ये रस्त्याचे काम चालू आहे. काही ठिकाणी रस्ते खोदले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याला खोदून लाईन मारल्यामुळे तेथे अनेक नागरिक व महिला गाडी घसरून छोटे मोठे अपघात होत आहेत. तसेच कोथरूड भागातील रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत आहेत. याच संदर्भात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कोथरूड विधानसभेचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयचे अति. आयुक्त विजय नाईकलं यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच रस्त्याच्या अर्धवट कामांवर तात्काळ लक्ष घालून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करून नागरिकांना होणाऱ्या नाहक त्रासामधून मुक्त करावे अशी मागणी केली. मागणी मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही गुरनानी यांनी प्रशासनाला दिला.
पूणे महानगर पालिका आणि ट्राफिक पोलीस मध्ये ताळ मेळ साधून मीटिंग होणे ही अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून रस्त्याच्या अर्धवट कामामुळे होणाऱ्या ट्रॅफिक नियंत्रात आणता येईल असंही युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी निवेदनातून म्हणाले. यावेळी युवक पदाधिकारी अमोल गायकवाड आणि अमित भगत उपस्थित होते.
शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच
एकीकडे शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढली असल्याचा दावा महापािलका प्रशासन करीत असले तरी, उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरु आहे. महापािलकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिलेल्या फलकासमाेरच कचरा टाकण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी महापािलकेच्या घन कचरा िवभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नंाना काही प्रमाणात यश येत असले तरी अद्यापही नागरीकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी हाेत नाही.
हेही वाचा: PMC News: शहरात उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच; दंडात्मक कारवाईचा नागरिकांना धाकच नाही
गेल्यावर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ काेटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापािलकेने वसुल केला अाहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती देणार असल्याची माहीती उपायुक्त संदीप कदम यांनी िदली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापािलकेच्या घन कचरा विभागाने कचरा जमा हाेणारे सुमारे ९२३ क्राॅनिक स्पाॅट शाेधून काढले हाेते. या क्राॅनिक स्पाॅटची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात अाहे. सुमारे ८० टक्के क्राॅनिक स्पाॅट हे कचरा मुक्त झाल्याचा दावा घन कचरा िवभागाकडून केला जात असला तरी, अद्याप शहरात नवीन क्राॅनिक स्पाॅट निर्माण हाेत अाहे.
नागरीकांकडून कचरा वर्गीकरण करून न देणे, माेकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देणे असे प्रकार सुरु अाहेत. महापािलकेने शहरातील क्राॅनिक स्पाॅटच्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्याचे फलक लावले अाहे. या फलकासमाेरच कचरा टाकला जात असल्याने कारवाई विषयी शंका उपस्थित हाेत अाहे.