पुण्यातील काचऱ्याची समस्या (फोटो- istockphoto)
पुणे: एकीकडे शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढली असल्याचा दावा महापािलका प्रशासन करीत असले तरी, उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रकार सुरु आहे. महापािलकेने दंडात्मक कारवाईचा इशारा दिलेल्या फलकासमाेरच कचरा टाकण्यात येत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी महापािलकेच्या घन कचरा िवभागाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नंाना काही प्रमाणात यश येत असले तरी अद्यापही नागरीकांकडून उघड्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण कमी हाेत नाही.
गेल्यावर्षभरात ५२ हजार ४०५ जणांवर कारवाई करुन सुमारे ३ काेटी २८ लाख १८७ रुपये इतका दंड महापािलकेने वसुल केला अाहे. पुढील काळात दंडात्मक कारवाईला गती देणार असल्याची माहीती उपायुक्त संदीप कदम यांनी िदली. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापािलकेच्या घन कचरा विभागाने कचरा जमा हाेणारे सुमारे ९२३ क्राॅनिक स्पाॅट शाेधून काढले हाेते. या क्राॅनिक स्पाॅटची संख्या कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात अाहे. सुमारे ८० टक्के क्राॅनिक स्पाॅट हे कचरा मुक्त झाल्याचा दावा घन कचरा िवभागाकडून केला जात असला तरी, अद्याप शहरात नवीन क्राॅनिक स्पाॅट निर्माण हाेत अाहे.
नागरीकांकडून कचरा वर्गीकरण करून न देणे, माेकळ्या जागेत, रस्त्याच्या कडेला कचरा फेकून देणे असे प्रकार सुरु अाहेत. महापािलकेने शहरातील क्राॅनिक स्पाॅटच्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्याचे फलक लावले अाहे. या फलकासमाेरच कचरा टाकला जात असल्याने कारवाई विषयी शंका उपस्थित हाेत अाहे.
अठरा पथकांमुळे कारवाईला मिळेल गती
महापािलकेच्या घन कचरा िवभागाला अठरा जीप उपलब्ध करून दिल्या आहेत. या वाहनातील पथक हे शहरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करीत आहे. सर्व गाड्या आता उपलब्ध झाल्याने कारवाईला गती मिळेल असा विश्वास उपायुक्त कदम यांनी व्यक्त केला. तसेच कचरा गाेळा करण्यासाठी ८१ नवीन वाहने घेतली जाणार आहे, त्यापैकी ३५ वाहने ही महापािलकेकडे आली आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही केली जात आहे. कचरा गाेळा करण्यासाठी वाहनांची संख्या वाढल्यानंतर कचरा वाहतुकीचा प्रश्न कमी हाेण्यास मदत हाेईल असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईचा आढावा
– सार्वजनिक ठिकाणी थंुकणे : १ हजार ४२ जणांकडून एकुण साडे दहा लाख रुपये दंड वसुुल
-सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे : ५ हजार ७९७ जणांकडून एकुण ११ लाख ७० हजार रुपये दंड वसुल
– कचरा जाळणे : ५६४ जणांकडून ५ लाख साडे १३ हजार रुपये दंड वसुल
– कचरा वर्गीकरण करून न देणे : ३ हजार ७८४ जणांकडून ८ लाख ३१ हजार ८१० रुपये दंड वसुल
– सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे : ३८ हजार ५४७ जणांकडून १ काेटी ९४ लाख ६७ हजार १८९ रुपये दंड वसुल