Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! पीक कर्जासाठी CIBIL ची अट नाही; सर्व बँकांना RBI च्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश

कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचा 'निल दाखला' तातडीने द्यावा आणि त्यानंतर नव्याने पीक कर्जवाटप सुरू करावे, अशा सूचनाही तावरे यांनी दिल्या.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 06, 2026 | 11:14 AM
नैसर्गिक आपत्तीचा ३,८१८ हेक्टरला फटका

नैसर्गिक आपत्तीचा ३,८१८ हेक्टरला फटका

Follow Us
Follow Us:

पुणे : शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना सिबिल (CIBIL) गुणांकनाची अट लागू नाही, असे भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) स्पष्ट केले असून, राष्ट्रीयीकृत तसेच सर्व बँकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिले आहेत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सुमारे सात हजार कोटी रुपये सहकार आयुक्तालयाच्या खात्यावर जमा झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर येथे झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (SLBC) बैठकीत तावरे बोलत होते. बैठकीस नाबार्ड, आरबीआय, राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँका, लघु वित्त बँका, बँक ऑफ महाराष्ट्र ग्रामीण बँक, राज्य सहकारी बँक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तावरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षात कर्जमुक्ती योजनेसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक निधी सहकार आयुक्तालयाला उपलब्ध करून देण्यात आला असून, पात्र कर्जखात्यांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महालक्ष्मी धोबीघाटात १५० पीएनजी गॅसजोडण्या ! लाकूड-कोळशाच्या वापराला मिळाला पूर्णविराम; प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना सहकार्य करावे. ३१ मार्च २०२६ अखेरच्या थकीत पीक कर्जावर अतिरिक्त व्याज आकारू नये. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचा ‘निल दाखला’ तातडीने द्यावा आणि त्यानंतर नव्याने पीक कर्जवाटप सुरू करावे, अशा सूचनाही तावरे यांनी दिल्या. बैठकीत आरबीआयच्या पीक कर्जासंदर्भातील मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी, कर्जमुक्ती योजनेचा आढावा आणि शेतकऱ्यांना सुलभ कर्जपुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुण्यनगरीत पावसाचा जोर ओसरला

पुणे शहरातील पावसाचा जोर आता कमी होण्याची शक्यता असली तरी जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवार (ता. ६) पुणे जिल्ह्यातील घाट विभागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’, तर शुक्रवार (ता. ७) ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

Mumbai Metro वर वाढता विश्वास; अवघ्या १७९ दिवसांत ३० कोटी प्रवाशांचा टप्पा पार, एमएमआरडीए मेट्रो नेटवर्कची मोठी झेप

Web Title: No cibil requirement for crop loans in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • maharashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!
2

Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line: हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी!

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ
3

चिमुकल्यांच्या स्वप्नातील ‘चॉकलेटचा बंगला’! श्रीकृष्ण मंडळ ट्रस्टच्या देखाव्याने पुणेकरांना घातली भुरळ

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा
4

Jalgaon Ganesh Visarjan 2026: विसर्जन मिरवणुकीआधी पोलिसांचा मोठा निर्णय! DJ बाबत गणेश मंडळांना दिला स्पष्ट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.