Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्ह्यात LPG Gas च्या काळाबाजाराबाबत एकही FIR नाही? मग सिलेंडरसाठी रांगा का?

Pune News: पुणे जिल्ह्यात कुठेही गॅस साठा किंवा काळाबाजार आढळून आलेला नसल्यामुळे एकही गुन्हा दाखल झालेला नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 13, 2026 | 06:24 PM
पुणे जिल्ह्यात LPG Gas च्या काळाबाजाराबाबत एकही FIR नाही? मग सिलेंडरसाठी रांगा का?
Follow Us
Follow Us:

गॅससाठा तपासात जिल्ह्यात एकही ‘एफआयआर’ नाही
घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीबाहेर रांगा
काळाबाजाराच्या चर्चांमुळे प्रशासनाने सुरू केली तपास मोहीम

पुणे: पुणे जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या अफवा आणि संभाव्य काळाबाजाराच्या चर्चांमुळे प्रशासनाने तपास मोहीम सुरू केली असली, तरी प्रत्यक्षात एकही एफआयआर नोंदवली गेलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गॅस साठा किंवा काळाबाजार सुरू असल्याच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मात्र दुसरीकडे घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्स्यांबाहेर रांगा लावाव्या लागत असल्याने परिस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. गॅस सिलेंडरच्या काळाबाजारावर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तहसीलमध्ये एक तपास पथक नियुक्त केले आहे. तसेच जिल्हास्तरावर दोन विशेष पथके कार्यरत ठेवण्यात आली असून प्राप्त तक्रारींची चौकशी करून अनियमितता किंवा काळाबाजार आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता.

जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधालकर यांनी सांगितले की, तपास पथके गॅस एजन्सींमधील उपलब्ध साठा तसेच ग्राहकांची प्रत्यक्ष मागणी याची पडताळणी करत आहेत. ज्या ठिकाणी गॅस सिलेंडरचा वापर संशयास्पदरीत्या अधिक दिसून येईल, त्या ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अनावश्यक सिलेंडर बुकिंग टाळावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

मात्र या तपास मोहिमेनंतरही पुणे जिल्ह्यात कुठेही गॅस साठा किंवा काळाबाजार आढळून आलेला नसल्यामुळे एकही गुन्हा दाखल झालेला नाही, असे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अधिकृत पातळीवर सर्व काही सुरळीत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यासाठी एजन्स्यांबाहेर रांगा लावाव्या लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
यामुळे “गॅसचा तुटवडा नाही आणि साठाही नाही, तर मग सिलेंडरसाठी रांगा कशासाठी?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाचे दावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये मोठी दरी असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.

 

Web Title: No one fir registered against illegal stock of lpg gas cylinder in pune district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • Israel Iran war
  • LPG gas cylinder
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.