Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMPML Bus: पुणेकरांसाठी खुशखबर! लवकर 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार; कुठे मिळणार बससेवा?

CNG Bus: विधानसभा निवडणूक पीएमपीएलला पावली आहे. निवडणुकीच्या काळात फार कमी दिवसात पीएमपीएलने वर्षभरापेक्षा जास्त बिझनेस केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 22, 2024 | 02:38 PM
PMPML Bus: पुणेकरांसाठी खुशखबर! लवकर 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार; कुठे मिळणार बससेवा?

PMPML Bus: पुणेकरांसाठी खुशखबर! लवकर 200 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार; कुठे मिळणार बससेवा?

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुणे महानगर परिवहन म्हणजेच पीएमपीएलच्या ताफ्यात २०० सीएनजी बस येणार आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी दिली आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. अतिरीक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून सीएनजी बस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु होती.

अखेर संचालकांच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. कमी किंमतीत या बस मिळणार आहेत. टाटा कंपनीच्या या बसची किंमत ही ४७ लाख रुपये असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत टाटा कंपनीच्या बस खरेदी करण्यासाठी अखेर मान्यता दिली आहे. आता या बस खरेदीसाठी पुणे महानगर पालिका ६० टक्के तर पिपंरी चिंचवड महानगर पालिका ४०  टक्के अर्थपुरवठा करणार आहे.

दरम्यान, पीएमआरडीसह एमआयडीसी आणि जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती संचालक मंडळाच्या बैठकीत दिली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या हद्दीतही बससेवा पुरवण्यात येत आहे. दरम्यान, एमआयडीसी आणि जिल्हा परिषद यांच्या हद्दीतील सेवेबद्दल कंपनीला संबंधित संस्थांकडून कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. त्यामुळे बस खरेदीसाठी या संस्थांनी देखील आर्थिक मदत करावी, अशा मागणीचे पत्र व्यवस्थापनाच्या वतीने पीएमआरडीए, जिल्हा परिषद, आणि एमआयडीसीला देण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.

हेही वाचा: Pune News: निवडणुकीमुळे पुण्याची ‘लाईफलाइन’ झाली मालामाल; PMPML ला मिळाले तब्बल 2 कोटींपेक्षा उत्पन्न

तिकीट दरवाढीसंदर्भात चर्चा नाही

दरम्यान, नवीन बस आल्यानंतर तिकीट दरवाढ होणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत देखील तिकीट दरवाढीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. मंत्रीमंडळातील खातेवाटपानंतर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती अतिरीक्त आयुक्तांनी दिली आहे. त्यामुळे दर वाढणार की नाही? यााबबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, नवीन बस आल्यानंतर तिकीट दरवाढ होणार का? असा देखील सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत देखील तिकीट दरवाढीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही.

निवडणुकीमुळे पुण्याची ‘लाईफलाइन’ झाली मालामाल

विधानसभा निवडणूक पीएमपीएलला पावली आहे. निवडणुकीच्या काळात फार कमी दिवसात पीएमपीएलने वर्षभरापेक्षा जास्त बिझनेस केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ‘पीएमपी’ च्या ९६८ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची वाहतूक करण्याकरिता निवडणूक आयोगाने पीएमपीच्या ९६८ बस आरक्षित केल्या होत्या. त्यात, पुण्यातील आठ आणि पिंपरी चिंचवड मधील तीन मतदारसंघ मिळून एकूण ११ मतदारसंघासाठी या गाड्यांचा वापर करण्यात आला. यातून पीएमपीला २ कोटी ४ लाख ९६ हजार ४३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Web Title: Pmpml 200 cng bus buy for punekar people service decision by pmc adittional comissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • pune news

संबंधित बातम्या

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा
1

‘भाजपच्या पक्ष नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित कराल तर…’; लहू बालवडकरांचा अमोल बालवडकरांना इशारा

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार
2

गोल्ड मेडलिस्ट, उद्योगपती ते पुण्यातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
3

Atharva Sudame : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
4

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.