(फोटो- pmpml)
पुणे: विधानसभा निवडणूक पीएमपीएल ला पावली आहे. निवडणुकीच्या काळात फार कमी दिवसात पीएमपीएलने वर्षभरापेक्षा जास्त बिझनेस केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून ‘पीएमपी’ च्या ९६८ गाड्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रांची वाहतूक करण्याकरिता निवडणूक आयोगाने पीएमपीच्या ९६८ बस आरक्षित केल्या होत्या. त्यात, पुण्यातील आठ आणि पिंपरी चिंचवड मधील तीन मतदारसंघ मिळून एकूण ११ मतदारसंघासाठी या गाड्यांचा वापर करण्यात आला. यातून पीएमपीला २ कोटी ४ लाख ९६ हजार ४३२ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
या मार्गावर होत्या सेवा पीएमपीएलच्या बसेस
चिंचवड स्व. शंकरराव गावडे सभागृह थेरगाव (पाण्याच्या टाकीजवळ) येथील १११ बस, पिंपरी ॲटो क्लस्टर सायन्स पार्क समोर चिंचवड येथे ७१ बस, भोसरी गुरुकुल इडब्ल्यूएस टाऊन हॉल घरकुल चिखली १११ बस, वडगाव शेरी राजाराम भिकू पठारे स्टेडियम खराडी येथील ९८ बस, शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे ६० बस, कोथरूड विश्वशांती गुरुकुल स्कूल एमआयटी पौड रोड कोथरूड येथे ७५ बस, खडकवासला सिंहगड कॉलेज आंबेगाव येथे ११२ बस, पर्वती शेट दगडूराम कटारिया हायस्कूल महर्षीनगर येथे ६३ बस, हडपसर चंद्रभागा बाबूराव तुपे साधना विद्यालय माळवाडी हडपसर येथे ११७ बस, पुणे कॅन्टोन्मेंट बीजे मेडिकल ग्राउंड येथे ६२ बस, तर कसबा पेठ गणेश कला क्रीडा केंद्र स्वारगेट येथे ११२ बस होत्या. यानुसार निवडणुकीसाठी लागणाऱ्या बसेसची सोय करण्यात आली होती.
रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला असून, महिला विवाह सोहळ्यावरून घरी निघाली होती. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालक सतीश राजाराम गोरे (वय २७, रा. कोंढणपूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा: रस्ता ओलांडताना जोरात बस आली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
पोलिसांच्या माहितीनुसार, साळुंके कुटुंबीय नातेवाईकांच्या विवाहासाठी शनिवारी रात्री पुणे-सातारा रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात गेले होते. रात्री सव्वानऊच्या सुमारास तक्रारदार साळुंके यांची आई आशाबाई, मुलगी प्रचिती घरी निघाले. नातूबाग परिसरातून ते रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव पीएमपी बसने रस्ता ओलांडणाऱ्या आशाबाई साळुंके आणि त्यांची नात प्रचिती यांना धडक दिली. अपघातात आशाबाई गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक फिरोज शेख तपास करत आहेत.