Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट

विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 31, 2025 | 09:06 PM
Purandar Airport: विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण सुरु; १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट
Follow Us
Close
Follow Us:
ʻपुरंदरʼच्या १५ गावांत बेकायदा प्लॉटिंगचा सुळसुळाट
विमानतळ परिसरात ‘PMRDA’चे सर्वेक्षण
भविष्यात खरेदीदारांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता

पुणे: पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या  आजूबाजूच्या गावांमध्ये रियलइस्टेट मार्केट चांगलेच  तेजीत आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत काही दलाल आणि विकासकांनी विनापरवाना प्लॉटिंगचा धंदा सुरू केला आहे. या बेकायदेशीर प्रकारावर आता पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) धडक कारवाई सुरू केली आहे.

विमानतळ होणार असल्याच्या चर्चेमुळे पुरंदर परिसरातील जमिनींचे भाव झपाट्याने वाढले आहेत. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत काहीजण विमानतळाच्या नावाखाली प्लॉट विक्री करत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते काढून शेतजमिनींचे तुकडे केले जात असून, प्लॉटिंगसाठी आवश्यक परवानग्यांची कोणतीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे या व्यवहारांमुळे भविष्यात खरेदीदारांची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे.

पीएमआरडीएचे सर्वेक्षण

पीएमआरडीएच्या अतिक्रमणविरोधी पथकाने गेल्या दोन दिवसांपासून पुरंदर तालुक्यातील सुमारे १५ गावांत सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. या गावांमध्ये आंबोडी, चिव्हेवाडी, देवडी, दिवे, गुऱ्होली, जाधववाडी, काळेवाडी, केतकावळे, कुंभारवळण, पवारवाडी, सिंगापूर, सोनोरी, उदाचीवाडी, वनपुरी आणि झेंडेवाडी यांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात अनधिकृत बांधकामे, रस्ते, सीमारेषा व विक्रीसाठी तयार केलेले प्लॉट यांची तपासणी करण्यात येत आहे. जेथे नियमबाह्य प्लॉटिंग आढळेल, त्या ठिकाणांवर पीएमआरडीएकडून नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पुरंदर विमानतळाला गावकऱ्यांचा ठाम विरोध; दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेत एकमुखी ठराव

 पीएमआरडीएचा इशारा

पीएमआरडीएने नागरिकांना स्पष्ट इशारा दिला आहे की, विनापरवाना प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक करू नका.

जमीन खरेदी करण्यापूर्वी संबंधित मालमत्तेला विकास परवाना आहे की नाही, हे खात्रीने तपासा.

अनधिकृत प्लॉटिंगमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात बांधकाम परवानग्या, नोंदणी आणि कायदेशीर कारवाईच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असाही इशारा पीएमआरडीएने दिला आहे.

सर्वेक्षण अहवाल तयार झाल्यानंतर संबंधित अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. काही ठिकाणी रस्ते बुजविणे, प्लॉटची सीमारेषा हटविणे आणि नोटिसा जारी करणे यासारखी कारवाई अपेक्षित आहे.

पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे की, ʻनियम मोडणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.

 

Web Title: Pmrda survey started in purandar airport real istate marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 09:04 PM

Topics:  

  • airport
  • Purandar
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी
1

RAIGAD: तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’ एव्हिएशन, हॉस्पिटेलिटी आणि हेल्थकेअर क्षेत्रात रोजगाराची सुवर्णसंधी

Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी
2

Airport Recruitment 2026: विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी! ‘AAICLAS’ मध्ये २२० जागांसाठी मेगा भरती; फ्रेशर्सनाही सुवर्णसंधी

पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य
3

पुरंदर विमानतळासाठीच्या भूसंपादनासाठी 920 एकर जमिनीसाठी संमतीचे करार; मुळ शेतकऱ्यांना प्राधान्य

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ
4

CSMIA चा जागतिक स्तरावर डंका! कचरा व्यवस्थापनात मानाचे ‘प्लॅटिनम रेटिंग’ मिळवणारं ठरलं देशातील प्रमुख विमानतळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.