Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्याच्या ‘या’ भागांमध्ये १० दिवस मद्यविक्रीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत, असे आदेश देण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मद्यविक्री बंद असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 09, 2024 | 01:30 AM
पुण्याच्या 'या' भागांमध्ये १० दिवस मद्यविक्रीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुण्याच्या 'या' भागांमध्ये १० दिवस मद्यविक्रीस बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्याच्या मध्यभागात गणेशोत्सवाच्या काळात दारू विक्री बंद करण्यात आली आहे. पुढील १०  दिवस ही विक्री बंद असणार असून, खडक, विश्रामबाग आणि फरासखाना या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहेत. पुणे पोलिसांनी याबाबत प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान दारु विक्रीबंदीची कडक अंमलबजावणी आता पोलिसांकडून सुरू असून, या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी दिला आहे.

गणेशोत्सव काळात मध्यभागात मोठी गर्दी होते. गर्दीत महिलांची छेडछाडीच्या घटना घडतात. तसेच काहींच्या मद्याने विनाकारण त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच उत्सवाच्या काळात खडक, फरासखाना, विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्यात यावी, अशी सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बैठकीत केली होती. त्यानंतर मध्यभागातील दारू दुकाने बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना पाठविला. जिल्हाधिकारी दिवसे यांनी याबाबतचे आदेश दिले. त्यानुसार गणेशोत्सवात मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, असे अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी सांगितले.

विसर्जन मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर १८ सप्टेंबर रोजी मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येणार आहेत, असे आदेश देण्यात आले आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मद्यविक्री बंद असणार आहे. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने, मद्यालये विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे

गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी (११ आणि १३ सप्टेंबर) गणेश विसर्जन होणाऱ्या परिसरातील मिरवणूक मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका असतील, त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व प्रकारची मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

आदेशाचा भंग करून कोणी मद्यविक्री करत असल्याचे आढळून आल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येईल. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी मद्यविक्री बंदीच्या आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करावी.

– प्रवीणकुमार पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, पुणे पोलीस

Web Title: Pune collector order to liquor ban in pune central area at ganpati festival 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2024 | 01:30 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Police News

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.