Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Budget 2025: पुणेकरांना करवाढीतून दिलासा; मात्र वीजबिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासाठी….

महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन वेळा लोक अदालत भरविली. त्याद्वारे एक कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी वसुल करण्यात आली असल्याचे महापालिकेने अंदाजपत्रकात म्हंटले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 06, 2025 | 02:35 AM
Pune Budget 2025: पुणेकरांना करवाढीतून दिलासा; मात्र वीजबिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासाठी….
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: महापालिका प्रशासनाने मंगळवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये करवाढ न करता पुणेकरांना एकीकडे दिलासा दिला. त्याचवेळी यंदाच्या आर्थिक वर्षापासुन मीटरप्रमाणे पाणी वापराचे बिल भरण्याची व्यवस्था मात्र केली. त्यामुळे नागरीकांना आता वीज बिलाप्रमाणेच पाणीपट्टी बिलासासाठीही खिशाला कात्री लागणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी महापालिकेचे २०२५-२६ या वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले.

डॉ. भोसले यांनी तब्बल १२ हजार ६१८ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर करून त्यास मंजुरी दिली. त्यावेळी त्यांनी करवाढीसंदर्भात कोणताही प्रस्ताव नसल्याचे आणि हे अंदाजपत्रक सर्वसामान्य नागरीकांसाठी आहे. या अंदाजपत्रकामध्ये पाणी पुरवठा, रस्ते सुधारणा व आरोग्य सेवेसाठी मोठी तरतूद केल्याचेही सांगितले. त्यामुळे नागरीकांना चांगलाच दिलासा मिळण्याची चिन्हे होती.

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी समान पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या सद्यःस्थितीची माहिती देऊन पाणी मीटर प्रणाली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. मीटरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याची दरवर्षी अंदाजे १२५ कोटी रुपये जमा होतात. २०२३-२४ या आर्थिक वर्षात १३० कोटी ९८ लाख रुपये, तर २०२४-२५ मध्ये ३१ जानेवारी अखेरपर्यंत १०२ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत. ३१ जानेवारी अखेरपर्यंत शहरात ४७ हजार ७० इतके नळजोडची संख्या आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर ‘PMPML’ अलर्ट; महिला सुरक्षेसाठी नव्या उपाययोजना लागू

पाणी मीटर बसविण्याची जबाबदारी संबंधित ग्राहकांचीच असल्याचे महापालिकेने नमूद केले आहे. नादुरुस्तीच्या काळात सरासरी वापरापेक्षा जादा वापर गृहीत थरुण बिल आकारणी केली जाते. मीटर दुरुस्त केल्यानंतर वसुली होणारी रक्कम ही २० ते २५ टक्के इतकी आहे. ही थकबाकी वसुली करण्याचे काम महापालिकेकडून सुरु असल्याचे अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.७२७ कोटी ९६ लाख रुपये थकबाकी आहे. दुबार पाणीपट्टी, नादुरुस्ती मीटर, नळजोड बंद, घोषीत झोपडपट्टीमधील पाणीपट्टी अशा विविध कारणांमुळे मीटर पाणीपट्टीची थकबाकी आहे.

महापालिकेकडुन पाणीपट्टी थकबाकी वसुलीवर भर

नागरीकांकडे मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी वसुल करण्यासाठी महापालिकेकडून विविध प्रयत्न सुरु आहे. महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात तीन वेळा लोक अदालत भरविली. त्याद्वारे एक कोटी १३ लाख रुपये इतकी थकबाकी वसुल करण्यात आली असल्याचे महापालिकेने अंदाजपत्रकात म्हंटले आहे.

Pune Budget 2025: आयुक्तांनी सादर केले 12 हजार कोटींचे बजेट; कराबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आरोग्यावर भर 
या अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी परिमंडळ उपायुक्त स्तरावर तक्रार निवारण समिती गठीत केली जाणार आहे. शहरी गरीब योजनेतून उपचार केले जातील, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात साथ रोग मोठ्या प्रमाणत पसरत आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी मेट्रो पॉलिटीन सर्वेलन्स युनीट तयार केले जाणार असून, त्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा, प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त केले जातील.

Web Title: Pune corporation budget tax relief to people eletricity and water bill latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Budget
  • Pune
  • pune news
  • tax

संबंधित बातम्या

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान
1

राजकीय घडामोडींना वेग; अजित पवारांसाेबत गेलेल्यांचे भाजपसमोर आव्हान

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार
2

Pune Election : भाजपसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान; युतीचा सस्पेन्स आज संपणार

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…
3

बायको आहे की हडळ? कौटुंबिक वादातून उचलले टोकाचे पाऊल, उकळता चहा पतीच्या चेहऱ्यावर आणि…

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
4

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.