पुणे: महापालिकेचे 2025-26 या आर्थिक वर्षाचे सुमारे साडे बारा हजार काेटी रुपयांचे अंदाजपत्रक प्रशासक तथा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी सादर केला. सुमारे १२ हजार ६१८.०९ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात महसुली कामांसाठी ७ हजार ९३ कोटी आणि भांडवली कामांसाठी सुमारे ५ हजार ५२४ कोटी रुपयांची तरतुद केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या अंदाजपत्रकात एक हजार काेटी रुपयांनी वाढ झाली आहे. काेणतीही करवाढ प्रस्तावित करतानाच, यंदा मीटर द्वारे पाणी पट्टी आकारणी सुरु केली जाईल असे आयुक्त भाेसले यांनी स्पष्ट केले आहे.
मावळत्या आर्थिक वर्षाचे ( 2024-25 ) अंदाजपत्रक सुमारे ११ हजार ६०१ कोटी रुपयांचे हाेते. या आर्थिक वर्षात ६ हजार ५०० कोटी इतके उत्पन्न जमा झाले अाहे. विशेषत: बांधकाम िवभागाचे उत्पन्न यावर्षी तुलनेत कमी झाले अाहे. अंदाजपत्रकातील तरतुदीपैंकी ७० टक्के खर्च झाला अाहे. अागामी अार्थिक वर्षात महापािलकेला सु जमा (५५ टक्के) झाले असून, मागच्या अर्थसंकल्पाच्या ७० टक्के खर्च झाला आहे. आगामी आर्थिक वर्षांत सुमारे १० हजार २३९ काेटी रुपये इतके उत्पन्न गृहीत धरण्यात आले आहे.
Pune: न्यायालयाच्या आदेशाने पाडलेले होर्डिंग पुन्हा उभारले; राजकीय वरदहस्त? महापालिकेची भूमिका काय?
आरोग्यावर भर
या अंदाजपत्रकात स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी परिमंडळ उपायुक्त स्तरावर तक्रार निवारण समिती गठीत केली जाणार आहे. शहरी गरीब योजनेतून उपचार केले जातील, त्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षात साथ रोग मोठ्या प्रमाणत पसरत आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी मेट्रो पॉलिटीन सर्वेलन्स युनीट तयार केले जाणार असून, त्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा, प्रशिक्षीत कर्मचारी नियुक्त केले जातील.
एकता नगरीसाठी क्लस्टरचा पर्याय
पुराचा फटका बसलेल्या सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी भागाचा प्रश्न साेडविण्यासाठी या भागात क्लस्टर डेव्हलपमेंट केली जाणार अाहे. पुर रेषेच्या आत असणाऱ्या सुमारे 350 नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यासाठी तरतूत करण्यात आली आहे. शहरातील स्मशानभूमी अद्ययावत केले जातील. मनपा मालकिच्या जागांचा किफायतशीर वापर करून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रय़त्न केले जाणार आहेत. वाहतूक नियोजनासाठी प्रमुख ३३ रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आली असून, समाविष्ट गावांसाठी ६२३ कोटींची तरतूद केली आहे.
इतर महत्वाच्या तरतुदी
भूसंपादनासाठी टीडीआर फायदेशीर ठरत नाही, त्यामुळे २०० कोटीपेक्षा जास्त निधी दिला आहे. मिसिंग लिंक ३३ कोटी भूसंपादनासाठी १५ कोटी, कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी ७५ कोटी, कामासाठी ५० कोटी तरतूद. अमृत महोत्सवी पुणे आरोग्य अभियान राबविणार येणार आहे. मनपा शाळेसाठी सिस्टर स्कूल योजना राबविण्यात आहे. तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविले जाणार आहेत. सिटी लॅयब्ररीमध्ये स्पर्धा परिक्षा केंद्र येथे सुरू केले जाईल. महंमदवाडीत स्पोर्ट्स कॉप्लेक्स, टाकावू वस्तू पासून शिल्प करण्यासाठी तरतूद केली गेली आहे.
बांधकाम परवानगी सह अन्य सोईंसाठी अॅप विकसित करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये काम हाती घेतले, त्य़ात समान पाणा पुरवठ्याचे १४१ झोनपैकी ७४ झोन पूर्ण ६६ टाक्या बांधून पूर्ण झाल्या. उर्वरित कामे वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जायका प्रकल्पातंर्गत ११ एसटीपी पैकी ५ प्लांट येत्या वर्षात पूर्ण होतील. मनपाचा मेडीकल कॉलेज चांगल्यारित्या काम सुरू आहे. २०२५-२६ मध्ये बांधकाम पूर्ण होईल. पीएमवाय मधून ४१७३ घरे माफक दरात उपलब्ध करुन देण्याचा प्रय़त्न आहे. मुंढवा, बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेड सेपरेटर. पीएमपी बस खरेदीसाठी तरतूद केली आहे. मनपा पद भरती करण्याचे नियोजन आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यासाठी अर्थ संक्लपात तरतूद करण्यात आली आहे.
स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर ‘PMPML’ अलर्ट; महिला सुरक्षेसाठी नव्या उपाययोजना लागू
मनपाला असे उत्पन्न मिळणार
१. स्थानिक संस्था करातुन (एलबीटी) ५४५ कोटी मिळणार
२. जीएसटी मधुन २ हजार ७०१ कोटी महापालिकेला मिळणार
३. मिळकत करातुन २ हजार ८४७ कोटींचे उत्पन्न
४. बांधकाम विकास शुल्कातुन २ हजार ८९९ कोटी रुपये मिळण्याचा अंदाज
५. पाणीपट्टी मधुन ६१८ कोटी वसूलीचे उद्दिष्ट
६. शासकीय अनुदान १ हजार ६३३ कोटी
७. कर्ज रोखे ३०० कोटी
८. इतर ९७५ कोटी रुपये जमा होणार आहेत.
या प्रकल्पांसाठी तरतूदी
– इमारतींच्या बांधकामासाठी ४९० कोटी रुपयांची तरतुद
– रस्त्यांसाठी १ हजार १२६ कोटी रुपयांची तरतुद
– नदी सुधारणा योजनेसाठी ३९६ कोटी रुपयांची तरतूद
– आरोग्यासाठी ५६९ कोटी रुपयांची तरतुद
– पाणीपुरवठ्यासाठी १ हजार ६६५ कोटींची तरतूद
– घनकचरा व्यवस्थापनासाठी १४२ कोटींची तरतूद