पुणे महानगरपालिका (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार वर्षभरापूर्वी पाडलेले होर्डींग पुन्हा उभारण्यात आले आहे. याप्रकरणी पडताळणी करून, त्यावर कारवाई केली जाईल असे महापािलका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या हाेर्डींग मालकाला राजकीय वरदहस्त असल्याची माहीती पुढे येत आहे. गेल्यावर्षी हे वादग्रस्त हाेर्डींग महापािलकेने पाडले हाेते. ते पुन्हा उभे केले जात असल्याने या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना हुसकाविण्यात आले हाेते. याचे व्हिडिओ व्हायरल झाले हाेते.
टिळक चौकातील संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागील बाजून नदीपात्रालगत तीन होर्डिंग एकत्र करून दीड वर्षापूर्वी एकच भले मोठे होर्डिंग उभारण्यात आले होते. होर्डींगच्या नियमावलीला मुठ माती देवून उभरलेल्या या होर्डींगवर माध्यमांनी प्रकाश टाकला होता. यानंतर तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या होर्डिंगवर जाहीरात प्रसिद्ध करण्यास बंदी घालून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
तसेच याप्रकरणी कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. त्यानंतर होर्डिंग व्यावसायिकाने सलग होर्डिंग वेगवेगळे करून तीन होर्डिंग केले होते. कारवाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन होर्डिंग मालकाने कारवाईस स्थगिती मिळवण्यासाठी महापालिका न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने कारवाईस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने फेब्रुवारी २०२३ मध्ये हे होर्डिंग पाडून टाकले होते.
या घटनेस एक वर्षाचा कालावधी गेल्यानंतर त्याच होर्डींग मालकाकडून आता पुन्हा याच ठिकाणी होर्डिंग उभारणी करण्याचे काम सुरू आहे. या हाेर्डींग मालकाला राजकीय वरदहस्त असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात प्रशासनाकडून चालढकल हाेत आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भाेसले यांनी या प्रकरणी चाैकशी केली जाईल, सर्व बाबी पडताळून हाेर्डींग वर कारवाई केली जाईल असे नमूद केले. दरम्यान अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी देखील संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून माहीती मागविली आहे. या प्रकरणी याेग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी नमूद केले.
Pune News: अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेची कारवाई; तब्बल 52 लाखांचा दंड वसूल
अनधिकृत फ्लेक्सविरोधात पालिकेची कारवाई
शहरात अनधिकृत फ्लेक्स बॅनरबाजी सुरू असतानाच अनधिकृत फ्लेक्स विरोधात महापालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह विभागाने कारवाई केली जात असल्याचा दावा केला आहे. गेल्या काही महिन्यात एकूण ५२ लाख रुपयाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे तसेच ११० जणांविरुद्ध कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७ मध्ये अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गेल्या वर्षी असेच आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने शहरातील अनधिकृतपणे उभारले जाणार्या होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स, किऑक्स विरुद्ध मागील तीन महिन्यांपासून मोहीम हाती घेतली आहे, त्याअंतर्गत ऑक्टोबर २०२४ मध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये १४४९ फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स, किऑक्स निष्कासित करण्याची कार्यवाही करण्यात आली होती.