Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

पुणे शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 01, 2026 | 12:13 PM
उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Follow Us
Close
Follow Us:
  • उपमहापौरांनी घेतला अरोग्यसेवांचा आढावा
  • अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना
  • आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांबाबत चर्चा
पुणे : पुणे शहरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या उद्देशाने उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस अति. आयुक्त  पवनीत कौर, आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रेमलता घाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गुणेश बागडे तसेच विद्युत व भवन विभागाचे अभियंते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीत शहरातील विविध महापालिका रुग्णालयांमधील प्रलंबित कामे, सेवा विस्तार, आवश्यक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य सेवा अधिक परिणामकारक करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय हे संपूर्णपणे महापालिकेमार्फत चालवून अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कै. द्रोपदाबाई मुरलीधर खेडेकर रुग्णालय येथे डोळे व दंत उपचार सुविधा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.

औंध रोडवरील कै. बाबुराव गेनबा शेवाळे रुग्णालय या इमारतीचा संपूर्ण उपयोग करून आवश्यक देखभाल व दुरुस्ती करत आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचे ठरविण्यात आले. तसेच औंध कुटी रुग्णालय येथे नूतनीकरण करून पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले. गोरगरिब व सर्वसामान्य नागरिकांना सुलभ, परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात येत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

बैठकीनंतर  उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी संबंधित विभागांना सर्व बाबींवर प्राधान्याने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच दुपारी १.३० ते ३ या वेळेत संबंधित अधिकाऱ्यांसमवेत वरील सर्व रुग्णालयांना प्रत्यक्ष क्षेत्रभेट देऊन सुधारणा कामांना त्वरित प्रारंभ करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा : पुण्याच्या ‘पाताळलोक’ प्रकल्पाचा मार्ग बदलणार; 32 हजार कोटींच्या भुयारी मार्गासाठी आता ‘सहा पर्यायांचा’ अभ्यास

Web Title: Pune deputy mayor parshuram wadekar has given important instructions to the officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, देवेंद्र फडणवीसांची माहिती
1

Devendra Fadnavis : जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, देवेंद्र फडणवीसांची माहिती

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?
2

Amravati Scandal : 180 अल्पवयीन मुली अन् 350 अश्लील व्हिडीओ..! मुलींना देह व्यापारासाठी धमकावले, काय आहे या व्हिडीओमागील सत्य?

Ratnagiri News : आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप
3

Ratnagiri News : आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप

Pune News: ‘आम्ही माफिया नाही तर…’; टँकर व्यावसायिकांनी उगारला संपाचा मार्ग, कारण काय?
4

Pune News: ‘आम्ही माफिया नाही तर…’; टँकर व्यावसायिकांनी उगारला संपाचा मार्ग, कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.