Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: ‘आम्ही माफिया नाही तर…’; टँकर व्यावसायिकांनी उगारला संपाचा मार्ग, कारण काय?

अलीकडील अपघातांनंतर टँकर चालकांवरच कारवाई होत असल्याची टीका व्यावसायिकांनी केली. प्रत्येक दुर्घटनेसाठी टँकर चालकांनाच जबाबदार धरले जात आहे, असे लोणकर म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 05:39 PM
Pune News: ‘आम्ही माफिया नाही तर…’; टँकर व्यावसायिकांनी उगारला संपाचा मार्ग, कारण काय?
Follow Us
Follow Us:

पुण्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र होण्याची शक्यता
१५ एप्रिलपासून सेवा बंद करण्याचा टँकर व्यावसायिकांचा निर्णय 
अनेक टँकर रस्त्यावर उतरू शकत नसल्याची तक्रार

पुणे: ‘टँकर माफिया’ असा आरोप फेटाळून लावत पुण्यातील (Pune) पाणी टँकर व्यावसायिकांनी संपाचा मार्ग स्वीकारला असून, १५ एप्रिलपासून सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तोट्यात सेवा देणे शक्य नसल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. यामुळे ऐन उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेत बोलताना टँकर मालकांचे प्रतिनिधी सुशांत लोणकर, रविकांत घुले आणि सुनील घुले यांनी ‘आम्ही माफिया नसून नागरिकांना पाणीपुरवठा करणारे सेवा प्रदाते आहोत,’ असा ठाम दावा केला.

पुणे शहरासाठी सुमारे १४ टीएमसी पाणी मंजूर असताना प्रत्यक्ष वापर २२ टीएमसीपर्यंत जात असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या सोसायट्यांसाठी महापालिकेकडून शाश्वत पाणीपुरवठा व्यवस्था नसल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अलीकडील अपघातांनंतर टँकर चालकांवरच कारवाई होत असल्याची टीका व्यावसायिकांनी केली. प्रत्येक दुर्घटनेसाठी टँकर चालकांनाच जबाबदार धरले जात आहे, असे लोणकर म्हणाले.

Pune News : महापालिका-जलसंपदा विभागात पाण्याच्या बिलावरून वाद; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

मागील दोन महिन्यांपासून आरटीओकडून वाहनांची पासिंग प्रक्रिया बंद असल्याने अनेक टँकर रस्त्यावर उतरू शकत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून त्यांनी योग्य ती कार्यवाही केली जाईल आश्वासन दिले आहे. तसेच सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही ट्रॅफिक पोलिसांकडून वाहन जप्त केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. नवीन नियमानुसार प्रत्येक टँकरसोबत हेल्पर ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यामुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. एका ट्रिपमागे सुमारे १५०० रुपयांचा अतिरिक्त खर्च येत असताना नफा केवळ ५०० ते ६०० रुपये असल्याने व्यवसाय तोट्यात जात असल्याचेही लोणकर यांनी स्पष्ट केले.

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम; भारतात पाण्याची बाटली महागण्याची शक्यता?

महापालिका-जलसंपदा विभागात पाण्याच्या बिलावरून वाद

जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाणी बिलाची ९४८ कोटींची थकबाकी न भरल्यास शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला. यासंदर्भात महापालिका देखील आक्रमक होऊ लागली आहे. महापालिकेकडे कोणतीही थकबाकी नाही तर जलसंपदा विभागाकडेच ४११ कोटी रुपये अधिकचे जमा असल्याचा दावा केला जात आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये पाण्याचा वापर वाणिज्यसाठी अत्यल्प असून, औद्योगिक पाणी वापर नाही. तरीही जलसंपदाकडून औद्योगिक दराने अवाजवी पाणी बिल आकारले जात आहे. हे चुकीचे आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला.

Web Title: Water scarcity crisis in pune is likely to intensify pune tanker traders strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:39 PM

Topics:  

  • pune news
  • Water supply
  • Water Tanker

संबंधित बातम्या

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?
1

पुण्यात वाढतेय मधमाश्यांसोबत सहजीवनाची नवी संकल्पना; काय आहे अर्बन बीकीपिंग’ची क्रेझ?

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग
2

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव
3

Anganwadi scheme : अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित
4

पुणे महापालिकेची सुरक्षा ऐरणीवर; आंदोलक आतपर्यंत पोहोचल्याने नगरसेवकांकडून सवाल उपस्थित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.