Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप

आंजर्ले येथील प्रसिद्ध Kadyavarcha Ganpati Temple मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 15, 2026 | 05:44 PM
आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप

आंजर्लेमधील कड्यावरच्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडून चोरी; भक्तांमध्ये संताप

Follow Us
Follow Us:

Ratnagiri News Marathi: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रसिद्ध कड्यावरच्या गणपती मंदिरात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी करत दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास केली. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे साधारण २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. आंजर्ले येथील कड्यावरच्या गणपती मंदिरात मध्यरात्री चोरीची धक्कादायक घटना घडली असून, चोरट्यांनी दानपेटी फोडून सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय गणेश निजसुरे (वय ५९, एलआयसी एजंट,. आंजर्ले) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी मंदिर परिसरात प्रवेश केला. या चोरट्यांनी निळ्या रंगाचे फुलहाताचे जॅकेट, काळ्या रंगाची पँट, पायात पांढऱ्या-काळसर रंगाचे बूट, डोक्यावर कानटोपी आणि तोंडावर मास्क घातले होते.

Akola Crime: अकोल्यात खळबळ! अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा; 15 हजारांची मागणी केल्याचा आरोप

चोरट्यांपैकी तिघांनी कोणत्यातरी लोखंडी हत्याराच्या साहाय्याने मंदिराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर वरच्या सभामंडपातील स्टीलची दानपेटी उचलून ती मंदिराजवळील शिवमंदिरासमोरील त्रिपुराच्या मागील बुरुजाखाली नेली. तेथे दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम आणि दोन स्टीलचे लॉकर चोरून नेण्यात आले.

चोरीस गेलेल्या मालामध्ये दानपेटीतील सुमारे ५० हजार रुपयांची रोख रक्कम, ज्यात ५००, २००, १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटांसह विविध मूल्यांची नाणी होती, तसेच ४० हजार रुपये किमतीचे दोन स्टील लॉकर असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गु.र. नं. ६२/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५(अ), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या घटनेतील महत्त्वाचा धागा म्हणजे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची हालचाल कैद झाली आहे. फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून, संशयितांची ओळख पटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती हे कोकणातील प्रसिद्ध श्रद्धास्थान असल्याने या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, मंदिराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Beed Crime: बीड हादरलं! तक्रार मागे घेण्यासाठी तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; शिवसेना माजी जिल्हाप्रमुखासह 7 जणांवर गुन्हा

Web Title: Anjarle kadyavarcha ganpati temple donation box theft news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • Dapoli
  • maharashtra
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.