Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वणव्यांच्या तडाख्यातून जंगलांची सुटका; सुखावणारा पाऊस, टेकड्यांनी घेतला मोकळा श्वास

Pune forest fire incidents : फेब्रुवारी-मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यात वणव्यांच्या घटनांनी उच्चांक गाठला होता. मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र होरपळून निघाले होते. मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जंगलातील आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2026 | 02:30 AM
Forest Fire Incidents Decline Sharply in Pune

Forest Fire Incidents Decline Sharply in Pune

Follow Us
Follow Us:
  • अवकाळी पावसामुळे पुण्यात वणव्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय घट
  • मार्चमध्ये ४०९ वणव्यांचा उच्चांक
  • वेताळ टेकडी, सिंहगडसह अनेक भागांना मोठा दिलासा
सुनयना सोनवणे : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पुणे जिल्ह्यात वणव्यांच्या घटनांनी उच्चांक गाठला होता. मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र होरपळून निघाले होते. मात्र एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जंगलातील आगींच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली असून वन विभागाला मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः पुणे शहर आणि परिसरातील टेकड्यांवरील वणव्यांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.

हे देखील वाचा : पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम

उन्हाळ्याची चाहूल लागताच वाळलेल्या गवताला आग लावण्याचे प्रकार सुरू होतात. दरवर्षी फेब्रुवारीपासून मेपर्यंत वणव्यांचे प्रमाण वाढत जाते. यंदा फेब्रुवारी महिन्यात पुणे जिल्ह्यात २१० वणव्यांच्या घटना नोंदवल्या गेल्या होत्या. वन विभागाने जाळपट्टे तयार करणे, गस्त वाढवणे अशा उपाययोजना केल्या; मात्र तरीही मार्चमध्ये वणव्यांची संख्या तब्बल ४०९ वर पोहोचली.

पुण्यातील वेताळ टेकडी, बावधन, पाचगाव, सिंहगड परिसरात दर दोन-तीन दिवसांनी आगीच्या घटना घडत होत्या. भोर, वेल्हे, कात्रज, जुन्नर या भागांमध्येही वणव्यांनी वनक्षेत्राचे नुकसान केले.

मात्र एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर परिस्थितीत बदल दिसून आला. अधूनमधून सुरू राहिलेल्या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आणि गवत ओलसर राहिल्याने आगी पसरण्याचा वेग मंदावला. परिणामी, पुणे शहरातील टेकड्या, पौड, नसरापूर, भांबुर्डा आणि वडगाव वन क्षेत्रात वणव्यांच्या घटनांमध्ये घट नोंदविण्यात आली. मे महिन्यात उष्णतेची तीव्रता आणि पावसाची स्थिती यावर पुढील नुकसानाचे चित्र अवलंबून राहणार असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

गेल्या चार महिन्यांतील वणव्यांची स्थिती

  • जानेवारी – ७३ घटना
  • फेब्रुवारी – २१० घटना
  • मार्च – ४०९ घटना
  • एप्रिल ते ५ मे पर्यंत – १८९ घटना

वनव्यामुळे होणारे नुकसान

  •  सुमारे ८५ टक्के वणवे मानवी कारणांमुळे लागतात.
  • नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या वणव्यांचे प्रमाण केवळ १५ टक्के.
  • वणव्यांत प्राणी, पक्षी आणि कीटकांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू.
  • अपुऱ्या मनुष्यबळामुळे वन विभागावर ताण.
  • वनवे लावणाऱ्यांवर कारवाई अपवादात्मकच असल्याने उपद्रवींना मोकळीक

विभागनिहाय नोंदवल्या गेलेल्या घटना

विभाग                           मार्च                    एप्रिल/मे
भांबुर्डा                           ५६                         १३
नसरापूर                         ३६                          ५
पौड गाव                         ४२                          ५
पुणे क्षेत्र                           ३८                          ५
सासवड परिसर               ७०                         ३८
शिरोटा                            २९                         २६
ताम्हिणी                           ११                          १९
वडगाव                            २४                          ९
राजगड                           ६७                         ३९

हे देखील वाचा : आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी? महिला दुपारी कांदा काढणीच्या कामासाठी गेली अन्…

Web Title: Pune forest fire incidents drop after unseasonal rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:30 AM

Topics:  

  • Forest Department
  • pune news

संबंधित बातम्या

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
1

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
2

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
3

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे
4

देशसेवेचा अभिमान, आधुनिक कौशल्यांची जोड! NCC कॅडेट्सना आता ड्रोन प्रशिक्षणासह सायबर सुरक्षेचे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.