Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Khadakwasla Dam: नदीपात्र वाहतुकीस बंद झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता यासह पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2025 | 03:29 PM
Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Pune Rain: मुठेचे रौद्रस्वरूप! खडकवासल्यातून ३९ हजार क्यूसेकने विसर्ग; नदीपात्र बंद, पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुणे शहर व उपनगरात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान धनकवडी, पुणे सातारा रस्ता, सिंहगड रस्ता यासह अन्य महत्वाच्या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान पानशेत, टेमघर, वरसगाव व खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. खडकवासला धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात ३९ हजार १३८ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलस्तर वाढला आहे.मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. मुठा नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आल्याने नदीपात्र वाहतुकीस बंद झाला आहे.

नदीपात्र वाहतुकीस बंद झाल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता यासह पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पुणे जिल्ह्यतील सात मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याचे समोर आले आहे. जिल्यात असणाऱ्या एकूण धरणांपैकी काही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना नदीकाठच्या रस्त्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, पुणे आणि परिसरातील घाटमाथ्यांवर जोरदार पावसाची नोंद झाली आहे.

#पुणे जिल्ह्यासाठी आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी #येलोअलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.नागरिकांनी खबरदारी घ्यावी-जिल्हा प्रशासनाचे आवाहन. pic.twitter.com/C3ZlkpZOOa — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 20, 2025

पुणे जिल्ह्यासाठी आज दि.२० ऑगस्ट २०२५ रोजी येलोअलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता.नागरिकांनी खबरदारी घ्यावी

-जिल्हा प्रशासनाचे आवाहन.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या निसर्गात सकाळी १० वाजता ३९ हजार १३८ क्युसेक इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी.

#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या विसर्गात सकाळी १० वाजता ३९ हजार १३८ क्यूसेक इतकी वाढ करण्यात येणार आहे. नागरिकांनी नदी पात्रात उतरू नये. खबरदारी घ्यावी- मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता, मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग, स्वारगेट, पुणे — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 20, 2025

मोहन भदाणे, उपविभागीय अभियंता,
मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग,
स्वारगेट, पुणे

घाटमाथ्यावरील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२० ऑगस्ट) भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद- @PuneZp चे शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. भाऊसाहेब कारेकर pic.twitter.com/dFd08d7QJk — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) August 20, 2025

शाळांना सुट्टी जाहीर 
घाटमाथ्यावरील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज (दि.२० ऑगस्ट) भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड आणि जुन्नर या तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद.

डॉ. भाऊसाहेब कारेकर, शिक्षणाधिकारी माध्यमिक,
जिल्हा परिषद, पुणे 

Web Title: Pune heavy rain khadakwasla release 39 thousand cuses water in mutha river traffic weather update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • pune news
  • Pune Rain

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.