Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम

मूठा नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीचे विशाल रूप पुणेकरांना पाहायला मिळत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 01:54 PM
पुणेकरांवर भीषण संकट! Khadakwasla धरणातून मुठा नदीत तब्बल ‘इतक्या’ हजार…; पावसाचा जोर कायम
Follow Us
Follow Us:

मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग 
खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस 
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rain Alert/Pune Rain Update: सध्या राज्यभरात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस सुरू आहे. तसेच पुणे आणि घाटमाथ्यावर देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. खडकवासला धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

खडकवासला धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे खडकवासला धरण जवळपास पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मुठा नदीपात्रात सकाळपासून 28 हजार क्यूसेक्सने पाणी विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

🚨महत्वाची सूचना🚨#खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून #मुठानदी पात्रामध्ये सुरु असलेल्या २७ हजार २०३ क्युसेक पाण्याच्या विसर्गामध्ये कमी करुन १८ हजार २७१ ने सुरु आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी.नदीपात्रात उतरू नये-जिल्हा प्रशासन#Khadakwasla#Pune#MuthaRiver#Rain#Mansoon — DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) July 8, 2026

मूठ नदीपात्रात सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पुण्यातील प्रसिद्ध असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मुठा नदीचे विशाल रूप पुणेकरांना पाहायला मिळत आहे. दरम्यान थोड्या वेळापूर्वी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे. 28 हजार क्यूसेक्सने सुरू असेलेला विसर्ग आता 18 हजारवर आणण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहून विसर्ग कमी जास्त केला जाऊ शकतो.

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पुण्याच्या महापौर मंजूषा नागपुरे यांनी भल्या पहाटेच सिंहगड रस्ता एकता नगर आणि अन्य विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. मात्र परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केला जाऊ शकतो.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसरात सुरू मुसळधार पावसाचा फटका आता तेथील नागरिकांना बसत आहे. सोमवारी व मंगळवारी दिवसभर कोसळलेल्या पावसानंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने संपूर्ण परिसराला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. मंदिराच्या चारही बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

नव्याने उभारण्यात आलेल्या सभा मंडपातही पावसाचे पाणी गळू लागल्याने विकासकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून मंदिर परिसरात विविध विकासकामे युद्ध पातळीवर सुरू आहे. सभा मंडप पायरी मार्ग, मंदिर परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि इतर कामावर गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून काम सुरू आहे. मात्र, या कामामध्ये योग्य नियोजन आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था न केल्याने पहिल्याच जोरदार पावसात त्रुटी उघड झाल्या.

Web Title: Pune khadakwasla dam water discharge 18000 cusecs in mutha river imd heavy rain alert to pune and maharashtra weather update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • Khadakwasla Dam
  • Pune Rain

संबंधित बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद
1

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अक्षरश: कहर; आतापर्यंत 38.32 टक्के पावसाची नोंद

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद
2

श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसर पहिल्याच पावसात जलमय; भीमाशंकरकडे जाणारी वाहतूक बंद

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव
3

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव

देशातील विविध भागांत पावसाचा हाहा:कार; अनेक ठिकाणी भूस्खलन तर काही ठिकाणी…
4

देशातील विविध भागांत पावसाचा हाहा:कार; अनेक ठिकाणी भूस्खलन तर काही ठिकाणी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.