Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maternal Mortality Rate : ‘आई सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’; पुण्यात मातामृत्यूदरात मोठी घट, गर्भवतींची वेळेवर तपासणी ठरली प्रभावी

Pune Maternal Mortality Rate : मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी एक दिलासादायक वृत्त समोर आले आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांत शहरातील मातामृत्यूदरात सातत्याने घट झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 10, 2026 | 06:38 PM
Pune maternal mortality rate

Pune maternal mortality rate

Follow Us
Follow Us:
  • आई सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित’
  • पुण्यात मातामृत्यूदरात लक्षणीय घट
  • आरोग्य यंत्रणेचे मोठे यश
Pune Maternal Mortality Rate : सुनयना सोनवणे : मातृदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील मातामृत्यूदरात सातत्याने घट होत असून, सुरक्षित मातृत्वासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. गर्भवतींची वेळेवर तपासणी, उच्चजोखीम गर्भधारणांची ओळख, शासकीय रुग्णालयांतील सुरक्षित प्रसूती आणि प्रसूतीनंतरची देखरेख यामुळे अनेक मातांचे जीव वाचत असल्याचे महापालिका आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.

MSRTC च्या NCMC कार्ड ला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पुण्यात महिनाभरात १ लाखांहून अधिक अर्ज

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये शहरात ७९ मातामृत्यूंची नोंद झाली होती. पुढील वर्षात हा आकडा ६७ वर आला, तर २०२५-२६ मध्ये तो आणखी घटून ४५ पर्यंत पोहोचला आहे. मातामृत्यूदरही १२२ वरून ७७ पर्यंत खाली आला असून, आरोग्य विभागासाठी ही महत्त्वाची सकारात्मक नोंद मानली जात आहे. राज्य पातळीवरही परिस्थितीत सुधारणा होताना दिसत आहे.

आरोग्य विभागाकडून गर्भवती महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. नियमित आरोग्य तपासण्या, आयर्न आणि फॉलिक ॲसिड गोळ्यांचे वितरण, जननी सुरक्षा योजना, मोफत रक्ततपासण्या आणि प्रसूतीपूर्व समुपदेशन याचा मोठा फायदा होत आहे. विशेषतः ‘हाय रिस्क प्रेग्नन्सी’ असलेल्या महिलांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. पुणे हे राज्यातील मोठे उपचार केंद्र असल्याने इतर जिल्ह्यांमधूनही गंभीर रुग्ण उपचारासाठी येथे येतात. त्यामुळे काही प्रमाणात आकडेवारीवर त्याचा परिणाम होत असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, प्रसूतीनंतरचा काळ अजूनही चिंतेचा विषय ठरत आहे.

२०२५-२६ मधील ४५ मातामृत्यूंपैकी ३४ मृत्यू हे प्रसूतीनंतर झाल्याचे समोर आले आहे. वेळेत उपचार न मिळणे, अतिरक्तस्राव, रक्तदाबातील गुंतागुंत आणि उशिरा रुग्णालयात दाखल होणे ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले. ‘आई सुरक्षित असेल, तर संपूर्ण कुटुंब सुरक्षित राहते,’ असे सांगत आरोग्य तज्ज्ञांनी गर्भधारणेपासून प्रसूतीनंतरच्या काळापर्यंत सातत्याने वैद्यकीय देखरेखीचे महत्त्व अधोरेखित केले. मातृदिनाच्या निमित्ताने सुरक्षित मातृत्वाबाबत जागरूकता वाढविण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

मातामृत्यू (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६)

वयोगटानुसार मातामृत्यू 

वर्ष                  २० पेक्षा कमी          २० ते ३०       ३० पेक्षा जास्त

२०२३-२४             ३                          ५०                     २५

२०२४-२५             ७                          ४०                     २०

२०२५-२६             ४                          ३०                      ११

एकूण                   ७९                         ६७                    ४५

शहरातील प्रसूतींची स्थिती

  • रुग्णालयात होणारी स्थिती – ९१.३ %
  • खासगी रुग्णालये – ५४.३ %
  • सरकारी रुग्णालये – ३७ %
  • इतर/घरी – ८.७ %
  • दरवर्षी अपेक्षित गर्भधारणा – ९६,१३८
  • दरवर्षी जिवंत जन्म – ५८,२१८
डिजिटल युगात बदलतेय मातृत्वाचं स्वरूप; आधुनिक मातृत्वाचा बदलता चेहरा ‘मदर्स डे’च्या निमित्ताने चर्चेत

Web Title: Pune maternal mortality rate decline pregnancy checkups prove effective

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 06:38 PM

Topics:  

  • Marathi News
  • mothers day
  • pune news

संबंधित बातम्या

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
1

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
2

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी
3

Vaping Ban Demand : लहान मुलं नशेच्या विळख्यात? चॉकलेट-फळांच्या फ्लेवरमध्ये निकोटीन प्रॉडक्ट्स; कठोर कायद्याची मागणी

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय
4

Designer Rakhi Business Idea : डिझायनर राख्यांना मोठी मागणी! फक्त ‘इतक्या’ रुपयांच्या गुंतवणूकीत सुरु करा व्यवसाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.