Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

पुणे मेट्रोच्या स्वारगेट-कात्रज, वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली या तीन विस्तार मार्गांसाठी राज्य सरकारने १८० कोटी रुपयांचा नवा निधी मंजूर केला आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 30, 2026 | 09:53 AM
Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

Pune News: पुणे मेट्रोच्या विस्ताराला राज्याची मोठी चालना; तीन मार्गांसाठी १८० कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Follow Us:
  • मेट्रोच्या तीन विस्तार मार्गांना १८० कोटी
  • स्वारगेट-कात्रजला सर्वाधिक १०० कोटी भागभांडवल
  • वनाज-चांदणी, रामवाडी-वाघोलीसाठी २० कोटी
 

पुणे : महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षात पुणे मेट्रोच्या तीन विस्तार प्रकल्पांसाठी १८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. स्वारगेट-कात्रज, वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली या मार्गांसाठी हा निधी देण्यात येणार आहे. यामुळे या प्रकल्पांच्या बांधकामाला गती मिळण्यासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. स्वारगेट-कात्रज या पूर्णपणे भूमिगत मार्गासाठी १०० कोटी रुपये भागभांडवल आणि ८० कोटी रुपये बिनव्याजी गौण कर्जाच्या स्वरूपात देण्यात येणार आहे. महामेट्रोमार्फत उभारण्यात येणाऱ्या या मार्गाचा मंजूर प्रकल्प खर्च २,९५५ कोटी रुपये आहे.

हेही वाचा: Crime News: सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद; काडतूस सापडताच हत्येचा उलगडा, सीसीटीव्हीत दोन हल्लेखोर कैद

स्वारगेट-कात्रजला १८० कोटी; आतापर्यंत २०० कोटी भागभांडवल

राज्य सरकारने स्वारगेट-कात्रज मार्गासाठी एकूण ३९८ कोटी रुपयांचे भागभांडवल देण्याचे निश्चित केले आहे. नव्या निधीनंतर या मार्गासाठी वितरित भागभांडवलाची रक्कम २०० कोटी रुपयांवर पोहोचणार आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२५ मध्ये ६० कोटी आणि डिसेंबर २०२५ मध्ये ४० कोटी रुपये देण्यात आले होते. याशिवाय या मार्गासाठी राज्याने ३२२ कोटी रुपयांचे गौण कर्ज मंजूर केले असून, नव्या हप्त्यानंतर त्यापैकी १६० कोटी रुपये वितरित झालेले असतील. मुख्य प्रकल्प कर्जाची परतफेड झाल्यानंतर महामेट्रोला हे गौण कर्ज एकरकमी परत करावे लागणार आहे.

हेही वाचा: Crime News: ‘लिव्ह-इन’मधून जन्मलेल्या बाळाचे तीन व्यवहार; ४८ तासांत चार हातांतून तेलंगणापर्यंत प्रवास

वनाज-चांदणी व रामवाडी-वाघोलीसाठी २० कोटी

वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली या दोन विस्तार मार्गांसाठी मिळून २० कोटी रुपयांचे भागभांडवल मंजूर करण्यात आले आहे. दोन्ही मार्गांची एकत्रित लांबी १२.७५ किलोमीटर असून, त्यावर १३ स्थानके प्रस्तावित आहेत. या मार्गांमुळे चांदणी चौक, कोथरूड, खराडी आणि वाघोली भागातील मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. दोन्ही प्रकल्पांचा सुधारित मंजूर खर्च ३,६२६ कोटी रुपये असून, राज्य सरकारने त्यासाठी ४८० कोटी रुपयांचे भागभांडवल देण्याचे मान्य केले आहे. १९ जून २०२६ रोजी ६० कोटी रुपये वितरित झाल्यानंतर नव्या निधीमुळे एकूण वितरित भागभांडवल ८० कोटी रुपयांवर जाईल. दरम्यान, केंद्र, राज्य आणि पुणे महापालिकेकडून मिळणाऱ्या निधीचा स्वतंत्र हिशोब ठेवण्याचे निर्देश महामेट्रोला देण्यात आले आहेत. नव्या निधीमुळे मेट्रो सुरू होण्याच्या नियोजित वेळापत्रकात बदल होणार नसून, बांधकामाची प्रगती, पुढील निधी आणि आवश्यक मंजुऱ्यांवर प्रत्यक्ष कार्यान्वयनाची तारीख अवलंबून राहणार आहे.

Web Title: Pune metro expansion routes 180 crore fund swaragete katraj wanaz chandani ramwadi wagholi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 09:53 AM

Topics:  

  • Metro
  • pune metro news
  • Swargate News

संबंधित बातम्या

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप
1

Thane News: कशेळी मेट्रो डेपोच्या भरावाचे काम संशयाच्या भोवऱ्यात; एमएमआरडीएच्या ठेकेदारावर स्थानिकांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.