आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच कॅार्पोरेटसाठी मल्टीमॅाडेल हब देखील ठरेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
अलीकडच्या काही वर्षांत स्वारगेट बसस्थानक वारंवार वाद विवादात सापडले आहे. काही महिन्यांपूर्वी येथे एक दुर्दैवी घटना घडली होती. त्या घटनेनंतरही प्रशासन किंवा शासनाने ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत.