Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार

सांस्कृतिक ओळख आणि रंगभूमीचे हृदय मानले जाणारे बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या ठिकाणी तीन थिएटर उभी केली जाणार आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 13, 2026 | 11:36 AM
बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार

बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार; महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार

Follow Us
Follow Us:
  • बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास होणार
  • महापालिका तब्बल 185 काेटी रुपये खर्च करणार
  • तीन थिएटर बांधण्याचा घेतला निर्णय
पुणे : सांस्कृतिक ओळख आणि रंगभूमीचे हृदय मानले जाणारे बालगंधर्व रंगमंदिरांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या ठिकाणी तीन थिएटर उभी केली जाणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिका सुमारे १८५ काेटी रुपये खर्च करणार आहे. पुणे महापालिकेने या ऐतिहासिक रंगमंदिराचा पुनर्विकास करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या भव्य पुनर्विकास प्रकल्पावर सुमारे १८५ कोटी खर्च केले जातील. या नवीन संकुलाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळी आसन क्षमता असलेले एक नाही तर तीन थिएटर बांधले जातील, ज्यामुळे विविध कार्यक्रम सुरळीतपणे पार पडतील.

 

महानगरपालिका या ऐतिहासिक रंगमंदिराचे जागतिक दर्जाच्या आधुनिक संकुलात रूपांतर करणार आहे. पुणे शहरातील एक ऐतिहासिक आणि प्रमुख रंगमंदिर म्हणून, बालगंधर्व रंगमंदिराची स्वतःची वेगळी ओळख आहे. गौरवशाली बालगंधर्व रंगमंदिर हा एक महान सांस्कृतिक वारसा आहे. हे रंगमंदीर ५४ वर्षांपूर्वी पु.ल. देशपांडे यांच्या संकल्पनेतून बांधण्यात आले होते. सर्व कलाकारांना त्यांची कला बालगंधर्व येथे सादर करण्याची इच्छा असते. तथापि, पूर्ण बुकिंगमुळे प्रत्येक कलाकारांना संधी मिळत नाही. मराठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महत्त्वाच्या राजकीय बैठका येथे आयोजित केल्या जातात. ही इमारत आता बरीच जुनी झाली आहे, त्यामुळे आधुनिक स्वरूपाची पुनर्बांधणी आवश्यकता वाटत आहे.

या समस्येवर लक्ष केंद्रित करून, २०१७ मध्ये तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आधुनिक इमारत, कलादालन, खुले रंगमंच आणि पार्किंग सुविधा विकसित करण्याची योजना सादर केली. तथापि, नाट्य उद्योगातील काही सदस्यांच्या विरोधामुळे ही योजना मागे पडली.परंतु आता महानगरपालिका प्रशासनाने या पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांनो सावध व्हा! राज्यात ‘या’ चार दिवसात वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता

परंपरा, आठवणी जपणार

सध्याचे बालगंधर्व रंगमंदिर २२,००० चौरस फूट जागेवर व्यापलेले आहे. मूळ रचना पाडून ३.५ लाख चौरस फूट रंगमंदिर बांधले जाईल. नवीन इमारतीत १०००, ५०० आणि ३०० लोकांची क्षमता असलेले तीन थिएटर असतील. याव्यतिरिक्त, नवीन इमारतीत तीन नवीन कलादालने असतील. एक १०,००० चौरस फूट क्षेत्रफळाची आणि दोन ५,००० चौरस फूट क्षेत्रफळाची. सध्या, कलादालनात फक्त ५०० चौरस फूट जागा आहे. याशिवाय, नवीन इमारतीत ८०० ते ९०० दुचाकी आणि ३५० चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा असेल. यामुळे पु. ल. देशपांडे आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या ५४ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणी कायमच्या जतन होतील.

Web Title: Pune municipal corporation has decided to redevelop the balgandharva rangmandir

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
2

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
3

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
4

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.