Pune Police on Ganpati Visarjan: अनंत चतुर्थीनिमित्त उद्या (६ सप्टेंबर) ११ दिवसांच्या शहरातील गणपतींचे विसर्जन होणार आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे, बँड, ढोल-ताशांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, या प्रचंड आवाजामुळे काहींना गंभीर त्रास सहन करावा लागतो. कान, हृदय यांसारख्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींना कायमचे अंपगत्व येण्याची किंवा जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे यंदा मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी महत्त्वाचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
फटाके : सार्वजनिक ठिकाणी आणि रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी
ज्वालाग्राही पदार्थ : मिरवणुकीत वापरास सक्त मनाई करण्यात आली आहे.
आवाजाची पातळी : साउंड सिस्टीम वापरताना डेसिबल मर्यादांचे पालन बंधनकारक राहील.
ध्वनिवर्धक : रात्री १२ वाजेपर्यंतच परवानगी
लेजर लाइट : डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून लेजर लाइटवर बंदी घालण्यात आली आहे.
ढोल-ताशा पथक : प्रत्येक गणेश मंडळास केवळ दोनच पथकांना परवानगी; एकूण वादकांची मर्यादा ६०. तसेच स्थिर वादन करण्यास बंदी.
कायदेशीर कारवाई : आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार.
अनंत चतुर्थी निमित्त उद्या सकाळी साडेनऊ वाजता सुरू होणारी गणेश विसर्जन मिरवणूक परवा दुपारपर्यंत सुरू राहील. या कालावधीत पुणे शहर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आठ हजारांहून अधिक पोलिस अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांची तैनाती करण्यात आली आहे.
यापूर्वीच पोलिसांनी डीजे, ढोल-ताशा पथक, साउंड सिस्टीम, लेजर लाइट, फटाके यावर विविध निर्बंध लागू केले आहेत. तसेच रात्री १२ वाजल्यानंतर ध्वनिवर्धक वापरण्यास सक्त मनाई आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असून, संपूर्ण शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने संशयितांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. पोलिस आयुक्त, सह आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह गुन्हे शाखा, बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस), शीघ्र कृती दल (क्यूआरटी), तसेच केंद्र आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथके सतत गस्त घालणार आहेत.
यापूर्वीच पोलिसांनी डीजे, लेजर लाइट, फटाके, ज्वालाग्राही पदार्थ आणि डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी उपकरणांवर बंदी घालून नियम जाहीर केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
मिरवणुकीतील सुरक्षेसाठी प्रमुख चौकांमध्ये पोलिस मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथके तैनात केली जाणार आहेत. तसेच सोनसाखळी व मोबाईल चोरीचे प्रकार टाळण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहतील. शहरातील सर्व लॉजेस आणि हॉटेल्सची तपासणी करून संशयितांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे.
यापूर्वीच पोलिसांनी डीजे, लेजर लाइट, फटाके, ज्वालाग्राही पदार्थ आणि डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त ध्वनी उपकरणांवर बंदी घालून नियम जाहीर केले आहेत. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.